अजून यौवनात मी...

अजून यौवनात मी...

काही दिवसांपूर्वी १५ वर्षांच्या अक्षयला त्याचे आई-वडील माझ्याकडे घेऊन आले होते. अक्षय पूर्वी अभ्यासात, खेळात उत्तम होता; पण गेल्या वर्ष- दोन वर्षांपासून त्याचे कशातही लक्ष लागत नव्हते. तो कोणाचेही ऐकत नव्हता. मोठ्या माणसांना जुमानत नव्हता आणि सिगारेट ओढत होता. मुलींची छेड काढणे, त्यांच्या मर्जीशिवाय लगट करणे असे प्रकार करू लागला होता. यौवनात प्रवेश करताना येणाऱ्या धोक्‍यांची कल्पना योग्य वेळी न दिली गेल्यामुळे अक्षय स्वतःचे नुकसान करत होता.

यौवन‌ ही मुले-मुली एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतात. त्या व्यक्तीवर, गोष्टीवर जिवापेक्षाही जास्त उत्कटपणे प्रेम करतात, त्याचबरोबर उत्कटपणे द्वेषपण करतात. हा टोकाचा विरोधाभासच यौवनाचे पहिले लक्षण आहे. मी सारे जग जिंकू शकतो, हा प्रचंड आत्मविश्वास याच वयात असतो. तसेच मला हे जमू शकणार नाही, माझ्यामध्ये ती क्षमताच नाही, म्हणून येणारे वैफल्यही याच वयात येते.

या वयात पालकांची भूमिका मुलामुलींना या विरोधाभासातला मधला मार्ग दाखवून देण्याची आहे. तू जग जिंकू शकतोस हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागवायचा तर आहेच; पण त्याचबरोबर जग जिंकणे हे एका दिवसाचे काम नाही व त्यासाठी काय तयारी करायला लागेल याची योग्य माहिती मुलांपर्यंत पोचवण्याची जबाबदारीपण पालकांचीच आहे. या वयात मुलामुलींमध्ये अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक बदल घडत असतात. हे बदल योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचवणे यालाच लैंगिक किंवा सामाजिक शिक्षण असे म्हणतात.हे बदल या मुलामुलींपर्यंत पोचवताना अनेक प्रश्न मनात येतात. 

 लैंगिकतेविषयी बोलण्याची गरज काय?  कुठल्या वयात याची माहिती द्यावी?   ही माहिती कोणी द्यावी?   हे बदल कसे सांगावेत?   नेमके काय सांगावे? आणि   नेमके काय सांगू नये? 

हे सगळेच प्रश्न पालकांच्या मनात सतत येत असतात. त्यांची योग्य उत्तरे न सापडल्यास मग पालक आपल्या मुलामुलींशी या विषयावर अगदीच तुटकपणे बोलतात किंवा बोलतच नाहीत, त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात. 

गरज कामजीवनाविषयी बोलण्याची -  
 लैंगिकतेकडे नेहमीच एक वाईट गोष्ट म्हणून बघितली जाते. वयात येणारी मुले कोणाशीच या विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत. मुले पालकांशी बोलायला घाबरतात, तसेच पालकही मुलांशी या विषयावर बोलायला बिचकतात. परंतु ही मुले कसेही करून लैंगिकतेविषयीची माहिती गोळा करतात आणि बऱ्याच वेळा ही माहिती अपुरी, बीभत्स व चुकीची असते, त्यामुळे ही मुले नको त्या चुका करून बसतात. त्या चुका टाळायच्या असल्यास मुलामुलींना स्त्रीरोगतज्ज्ञ, समुपदेशक यांच्याकडून लैंगिकतेविषयी माहिती करून दिलीच पाहिजे. 

टीव्ही, इंटरनेट यांच्यावरून नको ते दाखवले जाते; पण अपुऱ्या माहितीमुळे तेच बरोबर आहे, असे मुलांना वाटते. 

काय सांगावे
यौवनात प्रवेश करताना मुलामुलींमध्ये अनेक बाह्य व अंतर्गत बदल होतात. हे बदल स्पष्टपणे विवरण करून सांगावेत. परंतु हे सर्व बदल सांगण्याआधी पालकांनी या बदलांविषयी सखोल व शास्त्रीय माहिती मिळवावी. गरज पडल्यास समुपदेशकांची मदत घ्यावी. 

मुला-मुलींना सांगावयाची माहिती 
चांगला व वाईट स्पर्श यांच्यामधील फरक  आपल्या व विरुद्धलिंगी व्यक्तीच्या शरीरातील अवयवांविषयी शास्त्रीय माहिती.  या वयात होणारे मानसिक बदल व ताणतणाव यांची माहिती द्यावी, हे ताणतणाव कसे दूर करावेत.  शारीरिक स्वच्छतेचे पोषक आहार व शारीरिक व्यायाम यांचे महत्त्व  इंटरनेट व इतर संपर्क माध्यमांमधील धोके व वापरताना घ्यावयाची काळजी   व्यसनांविषयी जागृती  योग्य काय, अयोग्य काय यावर चर्चा करावी. आपली मते मुलांवर लादू नयेत, तर त्यांना ती पटतील अशा भाषेत समजून सांगावीत. 

त्याचबरोबर तुला कुठलीही समस्या आली तर तू माझ्याकडे येऊ शकतोस, हा विश्वास मुलांमध्ये जागा करावा. (क्रमशः)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com