चोरटेपणाने प्रवेश करणारे !

जागतिक पटलावर राजकीय आणि माध्यमविश्व ढवळून टाकणारी घटना म्हणजे पेगॅसस हेरगिरी प्रकरण !
Pegasus Spyware
Pegasus SpywareSakal

जागतिक पटलावर राजकीय आणि माध्यमविश्व ढवळून टाकणारी घटना म्हणजे पेगॅसस हेरगिरी प्रकरण ! सध्या सर्वच वृत्तपत्रांमधील बातम्यांचे मथळे हे ‘भ्रमणध्वनी हेरगिरी’ आणि ‘पेगॅसस स्पायवेअर’ने व्यापून टाकली आहे. डिजिटल युगामध्ये आपल्या खासगी माहितीची सहजरीत्या चोरी होऊ शकते. त्याबद्दल आपण सजग असणं गरजेचं आहे. राजकारणी, पत्रकार, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील डिजिटल हेरगिरीमुळे जगभरातील सरकारे सध्या टीकेचे धनी बनत आहे. पेगॅसस स्पायवेअर नक्की काय आहे, त्याचा उपयोग कसा होतो हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

काय आणि कसं घडतं?

आपल्या स्मार्ट भ्रमणध्वनीच्या ॲड्रोईड किंवा ॲपल आयओएस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये घुसून हेरगिरी करणारे एक अत्याधुनिक व्यावसायिक सॉफ्टवेअर म्हणजे पेगॅससॅ. २०१६ मध्ये प्रथम हे सॉफ्टवेअर आढळलं. परंतु जसा वेळ गेला तसं हे सॉफ्टवेअर अधिकच प्रगत होत गेलं आणि ताकदवानही. वापरकर्त्याला माहीत न होताच त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये शिरकाव करण्यासाठी हे सॉफ्टवेअर कुप्रसिद्ध असून, वापरकर्ता पेगॅससची ही घुसखोरी रोखू शकत नाही. ‘झिरो क्लिक अटॅक’ आणि ‘इन्स्टॉलेशन फिचर’ असलेले पेगॅसस सर्वात आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली आहे.

‘झिरो क्लिक अटॅक’ आणि ‘इन्स्टॉलेशन फिचर’ म्हणजे?

सर्वसामान्यतः सायबर गुन्हेगार वापरकर्त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये घुसण्यासाठी त्याच्याकडून चुकीच्या लिंकवर क्लिक करण्याची वाट पाहतात. यासाठी एसएमएस किंवा ईमेलचा वापर करण्यात येतो. परंतु यामुळे वापरकर्त्याला शंका येऊ शकते. झिरो क्लिक अटॅकमध्ये वापरकर्त्याशी कोणताही संवाद साधावा लागत नाही. म्हणजेच अशा कोणत्याही क्लिकची गरज पडत नाही. सायबर हल्लेखोर भ्रमणध्वनीमधील प्रसिद्ध ॲपचा वापर नियंत्रण मिळविण्यासाठी करतात. वापरकर्त्याच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे पेगॅसस स्पायवेअर त्यामध्ये प्रवेश मिळवते. व्हॉट्सअप वरील अतार्किक संदेशाच्या आधारे, अनोळखी मीस्ड कॉल, प्रसिद्ध ॲपवरच्या पोस्ट आदींच्या साहाय्याने भ्रमणध्वनीमध्ये हेरगिरीसाठी प्रवेश मिळवला जातो.

सॉफ्टवेअर काय करते?

एकदा का आपल्या भ्रमणध्वनीमध्ये अशा हेरगिरी सॉफ्टवेअरने प्रवेश मिळविला तर ते आपले संपर्क क्रमांक, संदेश, ई-मेल, छायाचित्रे, व्हिडिओ, लोकेशन इन्फॉर्मेशन, कॉल रेकॉर्ड आदींमधील माहिती चोरते. तसेच आपल्या भ्रमणध्वनीचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑन करत सर्व रेकॉर्ड करू शकते.

निर्माता आणि वापरकर्ते कोण?

एनएसओ ग्रुप नावाच्या इस्रायली कंपनीने पेगॅससची हेरगिरी सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. याची स्थापना २००९ मध्ये झाली असून, सुरवातीपासूनच अत्याधुनिक पाळत किंवा हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम ही कंपनी करते. पेगॅसस हे सहजच कोणीही ऑनलाइन पद्धतीने विकत घ्यावे असे सॉफ्टवेअर नाही. फक्त सरकारी कार्यालयांना किंवा संस्थांना ते विकले जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी आजपर्यंत चाळीस देशातील गुप्तहेर संस्था, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या संस्था आणि लष्कराला विकले आहे.

हेरगिरी शक्य आहे का?

पेगॅसस हे मोठ्या समुदायाच्या हेरगिरीसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान नाही. अगदी निवडक किंवा विशिष्ट व्यक्तीच्या हेरगिरीसाठी याचा वापर करण्यात येते. विशेष करून गुन्ह्यात किंवा दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींच्या हेरगिरीसाठी हे वापरण्यात येते. मात्र, त्याचा वापर प्रत्यक्ष कसा केला जातो याबद्दल कोणतीच स्पष्टता नसल्याचे एनएसओने म्हटले आहे.

किंमत किती ?

२०१६ च्या अंदाजानुसार एनएसओ ग्रुप १० लोकांच्या हेरगिरीसाठी कमीत कमी नऊ कोटी रुपये आकारत होते.

खरं तर बहुतेक स्मार्टफोनवर पेगॅससचा हल्ला करणे शक्य आहे. मात्र त्या सॉफ्टवेअरची किंमत पाहता सर्वसामान्यांच्या हेरगिरीसाठी त्याचा वापर शक्य दिसत नाही.

हे सॉफ्टवेअर कसे ओळखणार?

पेगॅसस सॉफ्टवेअरचे हल्ले ओळखणं सहजासहजी शक्य नाही. आपण काळजी घेतली तरी या सॉफ्टवेअरचा आपल्या भ्रमणध्वनीमध्ये शिरकाव होऊ शकतो.असे जरी असले तरी सायबर सुरक्षेसंबंधी काही मूलभूत नियमांचे पालन केले तर आपला भ्रमणध्वनी ‘हॅक’ होण्यापासून वाचवू शकतो.

  • तुमचे डिव्हाईस किंवा सॉफ्टवेअर सातत्याने अद्ययावत करत रहा

  • पाच वर्षांपूर्वीच्या भ्रमणध्वनीवर जर कालबाह्य सॉफ्टवेअर वापरात असतील तर ते सहज अशा सायबर हल्ल्यांचे भक्ष ठरू शकते.

  • प्रत्येक डिव्हाईस किंवा ॲपसाठी वेगळा पासवर्ड वापरा. सहजच ओळखता येईल असे पासवर्ड वापरू नका

  • अनोळखी लोकांकडून आलेल्या लिंक्स वर क्लिक करू नका

  • ॲन्टी मालवेअर सोल्यूशन्सचा वापर तुमच्या डिव्हाईसची सुरक्षा वाढविण्यासाठी करा

(लेखक ‘क्विक हिल टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे जॉइंट एमडी व सीटीओ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com