अशी बोलते माझी कविता (डॉ. शंतनू चिंधडे)

डॉ. शंतनू चिंधडे, ९८६०३३७४८३
रविवार, 21 मे 2017

अत्तर

 

शब्दांतुन मी आठवणींचे जपले अत्तर
पहा जरा ना डोकावुन तू...लपले अत्तर

 

शब्द खरे तर टपोर होते गुलाब माझे
त्यांना केवळ दिसले काटे...खुपले अत्तर!

अक्षर अक्षर फुलाप्रमाणे गुंफत होतो
धागे तुटले...डोळ्यांतुन टपटपले अत्तर

आठवते ना? चंद्रहि होता...समीप तूही
आणि तुझ्या मी ओठांवरचे टिपले अत्तर

आताशा मी वाट पाहतो...थकतो...सुकतो
मला वाटते दोघांमधले खपले अत्तर

तुझ्या नि माझ्या जरी वेगळ्या होतिल वाटा...
जपून ठेवू मिठीतले त्या अपुले अत्तर !

अत्तर

 

शब्दांतुन मी आठवणींचे जपले अत्तर
पहा जरा ना डोकावुन तू...लपले अत्तर

 

शब्द खरे तर टपोर होते गुलाब माझे
त्यांना केवळ दिसले काटे...खुपले अत्तर!

अक्षर अक्षर फुलाप्रमाणे गुंफत होतो
धागे तुटले...डोळ्यांतुन टपटपले अत्तर

आठवते ना? चंद्रहि होता...समीप तूही
आणि तुझ्या मी ओठांवरचे टिपले अत्तर

आताशा मी वाट पाहतो...थकतो...सुकतो
मला वाटते दोघांमधले खपले अत्तर

तुझ्या नि माझ्या जरी वेगळ्या होतिल वाटा...
जपून ठेवू मिठीतले त्या अपुले अत्तर !

Web Title: dr shantanu chindhade's poem in saptarang