आयोडीनयुक्त मीठ खा स्वस्थ राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयोडीनयुक्त मीठ

आयोडीनयुक्त मीठ खा स्वस्थ राहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आयोडिनची कमतरता नसताना आपण आयोडिनयुक्त मीठ घेतल्याने आपल्याला अपाय होणार नाही. शरीराला आवश्यक असेल एवढेच आयोडिन वापरले जाते आणि बाकीचे आयोडिन लघवीवाटे बाहेर टाकले जाते.

आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार गंभीर समस्या झाली आहे. मुलांना ‘देशाची संपत्ती’ असे संबोधले जाते. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांपासून वाचवले पाहिजे. ‘आयोडीन’ महत्त्वपूर्ण खनिज द्रव्यांपैकी एक खनिज आहे. आहारातील आयोडीन शरीराच्या भौतिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असते. आयोडीनची ९० टक्के गरज अन्नातून आणि १० टक्के आयोडीन पाण्यातून मिळते. मिठाच्या आयोडिनीकरणासाठी साध्या मिठात पोटॅशिअम आयोडेट वापरले जाते. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

हेही वाचा: पोहे डोसे

आपल्या गळ्यात वरच्या भागात थॉयरॉइड ग्रंथी असते. ही ग्रंथी आयोडीनचा उपयोग करून थायरॉक्झीन (टी-4) आणि ट्राय-आयडोथायरॉक्झीन (टी-3) नावाचे हार्मोन्स तयार करते. शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी या होर्मोन्सची आवश्यकता असते. थॉयरॉक्झीन कमी पडल्यास व्यक्ती निरुत्साही बनते. लवकर थकवा येतो. त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे विविध आजार म्हणजे गलगंड, मानसिक दुर्बलता, मुकेपणा, बहिरेपणा, तिरळेपणा, उभे राहण्याची आणि चालण्याची क्षमता कमी होणे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आयोडिनच्या कमतरतेची समस्या अधिक आढळते.

मिठाचे आयोडीकरण हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध करण्याचा साधा सोपा परिणामकारक उपाय आहे. आयोडीनयुक्त मिठाचे सेवन केल्यास आपली दैनंदिन आयोडिनची गरज पूर्ण होऊ शकते. समद्री अन्नपदार्थांमध्ये आयोडिनचे प्रमाण भरपूर असते. परंतु डोंगराळ आणि पूरग्रस्त भाग या ठिकाणी जमीन व पाण्यात आयोडीनचे प्रमाण फारच कमी असते. महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास औरंगाबाद, जालना, वर्धा, अमरावती, बुलढाणा, सातारा, ठाणे, लातूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आयोडीनच्या कमतरतेचे रोगी जास्त प्रमाणात आढळतात.

हेही वाचा: पोशिंद्यासमोरच उदरनिर्वाहाचा प्रश्न

आयोडीनयुक्त मीठ रोजच्या वापरात खूपच कमी लागते. जसे १० ग्रॅम मीठ या अंदाजाने प्रत्येक माणसाला महिन्याकाठी ३०० ग्रॅम आणि ५ जणांच्या कुटुंबाला १.५ किलोग्रॅम मीठ लागते. आयोडिनची कमतरता नसताना आपण आयोडिनयुक्त मीठ घेतल्याने आपल्याला अपाय होणार नाही. शरीराला आवश्यक असेल एवढेच आयोडिन वापरले जाते आणि बाकीचे आयोडिन लघवीवाटे बाहेर टाकले जाते. आयोडीनयुक्त मिठाचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत. आयोडीकरणाचा प्रयोग यशस्वीपणे राबविल्यास मुलांच्या शैक्षणिक क्षमतेत वाढ होणे, प्रौढांची कार्यक्षमता वाढणे याशिवाय जीवनमानाचा दर्जा उंचावणे यासारखे मनुष्यबळ विकासाशी निगडित फायदे होतात. आयोडिनयुक्त मीठ गर्भवती स्त्रिया, अर्भके तसेच आजारी व्यक्तींसाठी सुरक्षित असते.

-डॉ. श्रीराम गोगुलवार, प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर

loading image
go to top