प्रेमानुभूती (सत्य घटनेवर आधारित)

प्रेमानुभूती
प्रेमानुभूतीFile photo

मी जन्मास आले अन,

आभाळभर आनंद झाला

माझ्या रडण्याने आईचा

पदरही ओला झाला...

माझ्या चिमुकल्या स्पर्शाने

तिला पान्हा फुटला

थोड्याच वेळात तोही आटला

अन वात्सल्याचा धागा तुटला...

गारठली ममता

प्रेमानुभूती हरवली

आई या शब्दाला एका

आईनेच काळिमा फासला...

मुलगी जन्माला आली घरी

खाणारी अजून एक वाढली

पाचवा भार उचलायचा कसा?

विचारने बुद्धीही त्यांची गहाण पडली...

मला आजार आहे समजताच

दामिनीही गहिवरून कडाडली

गरिबाच्या छाताडावर जणू

नियनीने लाथच मारली...

माझा जन्मोत्सव बाटला

कोरड्या भावनेत दाटला

माझ्याबद्दलच्या प्रेमानुभूतीचा

झरा मनातल्या मनात आटला...

दवाखान्याच्या चार भिंतीत

आणि माणसांच्या गर्दीत

तिथेच सोडून निघाले

माझे निर्दयी जन्मदाते

मागे वळून न बघण्यासाठी...

डॉक्टरांमध्ये होती माणुसकी

ओतप्रोत भरली होती प्रेमानुभूती

मला मायेने कवेत घेऊन

दिले नाव कौतुकी...

लालन पालन झाले तेथेच

कोड कौतुकही तेथेच झाले

माझे बोबडे बोल ऐकण्यास

साऱ्यांचे कान आतूर झाले...

मायनं ममतेला तुडवले

पण डॉक्टरांच्या रूपाने

मेडीकल परिसरात

मला कौतुकाने जपणारे

मायबाप भेटले...

तीन वर्षांची झाली तेव्हा

बिघाड तब्बेतीत झाला

प्रेमाचा वर्षाव करणारी

सारी माणसं बिथरली...

माझ्या जन्मदात्यांना मात्र

कधीच आठवण आली नाही

प्रेमानुभूतीने वाढवले मला

ते कधीच विसरले नाही...

कृतज्ञता व्यक्त करून

निरोप घेते जगाचा

आक्रोश झाला होता

तेव्हा या सजीव सृष्टीचा...

-पल्लवी वाहणे, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com