सिनेमॅटिक इफेक्‍टद्वारे गडकिल्ल्यांचे दर्शन घडविण्याचा छंद

जीवन शंकर कदम
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

माणसाने आयुष्यात येऊन व्यक्त होणे खूप गरजेचे असते. कोणी कवितेतेतून तर कोणी लिखाणातून, कोणी संभाषणातून तर कोणी वेगवेगळ्या कलांतून व्यक्त होत असते. आणि जेव्हा मला माझ्यातला मी शोधावासा वाटला तेव्हा असा वाटलं की आता ती वेळ निघून गेली आहे. मला आता फक्त नोकरी, पैसे, घर दार या सर्व गोष्टींनी वेढलं होतं. मला माहिती होतं की माझी या सर्वांमध्ये घुसमट होतेय पण मला मार्ग सापडत नव्हता. खरं तर माझ्या आवडी निवडी खूप होत्या जसे मला क्रिकेट खेळायला, लिहायला, डान्स करायला आणि बरंच काही करायला आवडत होतं. पण, मला त्या जोपासता येत नव्हत्या. जोपासता येत नव्हत्या म्हणण्यापेक्षा मला त्याच्यासाठी वेळच देता येत नव्हता.

त्यातच Youtube सारखा एक पर्याय माझ्या समोर आला. तो मला "प्रसाद वेदपाठक (Ur Indian Consumer) या माझ्या मित्राकडून समजला. कारण तोही त्यावेळी या क्षेत्रात पाय रोवू पाहत होता. मग विचार करू लागलो कि मीसुद्धा असा काही करू शकतो पण नक्की कुठून सुरुवात करू हे समजत नव्हते, सर्व तयारी झाली होती. Youtube साठी लागणाऱ्या गोष्टी मी घेऊन ठेवल्या होत्या. अर्थात चांगला कॉम्पुटर आणि कॅमेरा आणि मग एक दिवस आला जेव्हा आम्ही तापोळाला पिकनिक साठी जाणार होतो आणि मी सहज एक व्हिडिओ बनविला आणि तो ही मराठीमध्ये. नंतर तो मी व्हिडिओ Edit करून Youtube वर अपलोड केला आणि त्या व्हिडिओला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्या आधी मी माझे JeevanKadamVlogs नावाचे युट्युबवर चॅनेल तयार केले. पुढे मग मी व्हिडिओ बनविणे चालूच ठेवले. त्यातूनच नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. या सर्व गोष्टींमध्ये मला माझ्या आई वडिलांचे तर आशीर्वाद लाभलेच पण प्रतिमाची अर्थात माझ्या बायकोचीसुद्धा खूपच चांगली साथ लाभली. हे सर्व करता करता असा समजले कि अशा प्रकारचे मराठी Vlogging व्हिडिओस दुसरे कोणीच बनवत नाहीत आणि मग या गोष्टी कडे मी थोडे गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून असे समजले की मी याच माध्यमाचा चांगला वापर करून महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी लोकांना माहितीपूर्ण व्हिडिओज दाखवू शकतो. त्यातूनच आपण चांगले सामाजिक संदेश सुद्धा देऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, सह्याद्रीचे सौंदर्य आणि आपल्या गडकिल्ल्यांनी जपलेला तो अनमोल इतिहास जर आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला तर ही एक माझ्याकडून छोटीसी सेवा होऊ शकते.

लोकांना घरबसल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ठिकाणांची तसेच गडांची माहितीपूर्ण भ्रमंती ती ही सिनेमॅटिक इफेक्‍टमध्ये. त्याचबरोबर त्याला एक पाश्‍चिमात्य संगीताचा टच देऊन तरुणाईला अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष आकर्षित करून त्यामधून आपला समृद्ध इतिहास आणि वेगवेगळी पर्यटन ठिकाणे दाखवायला सुरुवात केली आणि त्याला लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळू लागला. Youtube च्या माध्यमातून मला माझी मते, सामाजिक संदेश, दुर्लक्षित गोष्टी लोकांच्या समोर आणता येत होत्या, ही सर्वात मोठी बाब होती माझ्यासाठी.

जस जसा आपला देश Digital होत चालला आहे तस तसे लोकांचा कल हा जास्त Social Media व Youtube सारख्या मनोरंजक गोष्टींकडे वळत आहे. त्यामुळे आपण लोकांना अशाच माध्यमातून त्यांना हव्या त्या गोष्टी दाखवू शकतो. अलिकडे लोक अशा गोष्टी मोबाइलवर सहजरित्या बघू शकतात आणि हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे दर्शकांसोबत लगेच संवाद साधून हव्या त्या सुधारणा आपण आपल्या चॅनेलमध्ये करू शकतो. येणाऱ्या पिढीसाठी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण त्या पिढीला आपला महाराष्ट्र कसा आहे, आपले गडकिल्ले काय आहेत आणि त्याबाबतची गोडी लावण्याकरिता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असा मला वाटते आणि माझे चॅनेल सुद्धा अशाच गोष्टींवर भाष्य करणारे आहे आणि इथूनपुढेही असणार आहे. माझ्या चॅनेलद्वारे आतापर्यंत किल्ले, पर्यटन ठिकाणे आणि इतर काही व्हिडिओज दाखवण्यात आले आहेत. इथून पुढे माझा आणखी खूप मोठा प्रवास असणार आहे. ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गडकिल्ले, पर्यटन ठिकाणे, महाराष्ट्रातील संस्कृती वेगवेळ्या प्रथा, जनजीवन, विचारमंथन आणि बरेच काही.

पुढील प्रवासासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि साथ हवी आहे!

Web Title: Fort view with Cinematic effect