बोलणाऱ्यांना बोलू द्या; अन्यथा..

Freedom of expression is need of the hour for healthy democracy
Freedom of expression is need of the hour for healthy democracy

आजकाल आपल्या देशात अनेकजण बोलू लागले आहेत अनेकांच्या मनातलं बोलू लागले आहेत त्यामुळे हे बोलायला नको होतं असं वाटणाऱ्यांना कदाचित ते सहन होणार नाही त्यांच्या या बोलण्याने समाजमन ढवळून निघत आहे एवढं नक्‍की.

काय बोललं पाहिजे आणि का बोललं पाहिजे या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यापेक्षा जो कोणी बोलला तो काहीबाही बोलला असेल तर त्याला तेथेच थांबवणे आणि समाजाच्या भल्याचं बोलला असेल तर त्यावर मंथन करणे ही लोकशाही प्रक्रिया अबाधित ठेवली पाहिजे.. कारण बोलणारे मनमोकळं करताहेत.

हनुमानाबद्दल बोलणाऱ्या वाचाळवीरांना थांबवणे ही जशी काळाची गरज आहे तसे देशातील परिस्थितीवर कडवट बोलणारे का बोलत आहेत यावर मंथन होणे ही देखील काळाची गरज असल्याचे आपण ओळखले पाहिजे आणि इतकं कडवट बोलण्याएवढी परिस्थिती नसेल तर त्यावरदेखील बोलणे आवश्‍यक आहे.

अलिकडच्या काळात अभिनेता नसिरूद्दीन शाह यांच्या वक्‍तव्यावर वादळ उठलं. ते का बोललेत याचा कुणी विचार केला नाही. देशातील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणाऱ्या घटनांकडे मूग गिळून बसणे आणि पाहणे खचितच योग्य नाही. काही अप्रिय घटनांनी देशातील लोकांमध्ये आपआपसात तेढ निर्माण करण्याची भावना उत्पन्न केल्याने आपलं मन कोणी मोकळं केलं तर काहीच वाईट नाही. पण त्याला देशद्रोही ठरविण्याइतपत टोक गाठणं जरा अतिशयोक्‍तीच वाटते.

प्रत्येकाला या देशात जसा बोलण्याचा अधिकार आहे तसा ते बोलणं खोडून काढण्याचा देखील अधिकार आहे.

आधीच शत्रूराष्ट्र मानला जाणारा शेजारी देश आपल्या देशातील प्रांतात अतिरेकी कारवायांना पाठबळ देत आहे आणि त्यात असं मन मोकळं करणाऱ्याला जर कोणी वाळीत टाकायला निघालं तर त्याचा लाभ हे राष्ट्र घेत राहील यात शंका नाही. हे तर बरं नसिरूद्यीन शाह यांनी देशातील टीकाकारांच्या आधी त्या पाकच्या पंतप्रधानांचा समाचार घेऊन आपल्या भावनांचं शहाणपण अधोरेखित केलं. त्यांनी नंतर टीकाकारांचा समाचार घेतांना मी देशद्रोही नाही, देशभक्‍त आहे आणि हे मला ओरडून सांगण्याची गरज वाटत नाही  असे सांगून आपल्या भारतीयत्वाचा परिचय करून दिला.

या घडामोडींवर दोन्ही बाजूंनी मंथन होत असतांना प्रख्यात लेखक लक्ष्मण माने यांनी याच कालावधीत केलेलं "जात डोक्‍यातून जायला हवी" हे केलेलं वक्‍तव्य खुप लक्ष वेधून घेतं. आपल्या देशात तसं पाहिलं तर सहसा राजकीय व्यासपीठावरूनच जात डोकावत असते.तसं गावागावात आपण सर्व लोक शेजारी-पाजारी बंधूभावाने, समतेने राहत असतात, शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाल्यावर तर ही समता अधिक अधोरेखित होत आहे, मात्र तिला नसिरूद्यीनच्या वक्‍तव्यासारखं प्रसिध्दीचं वलय लाभत नाही हीच शोकांतिका आहे.

कदाचित म्हणूनच यशवंत भालेकरांसारखा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेला तरी त्याची दखल कुणाला घ्यावीशी वाटत नाही.

प्रत्येकाला या देशात जसा बोलण्याचा अधिकार आहे तसा ते बोलणं खोडून काढण्याचा देखील अधिकार आहे. तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी देशाच्या एका केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी तृतीयपंथीयांबाबत उपहास करणारे भाष्य केल्याबद्यल त्यांच्या बेताल वक्‍तव्याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे आपण बोललं पाहिजेच पण आपल्या बोलण्याचा आपला शत्रू लाभ घेणार नाही याची काळजी घेणे हीच आज काळाची मोठी गरज आहे.

आधीच शत्रूराष्ट्र मानला जाणारा शेजारी देश आपल्या देशातील प्रांतात अतिरेकी कारवायांना पाठबळ देत आहे आणि त्यात असं मन मोकळं करणाऱ्याला जर कोणी वाळीत टाकायला निघालं तर त्याचा लाभ हे राष्ट्र घेत राहील यात शंका नाही.

भारतासारख्या देशात बौध्दिक कौशल्याची वाण नाही हे प्रगत देश ओळखून आहेत, त्यामुळे ते या अशा वाचाळवीरांच्या करामतीत नाक खुपसत नाहीत उलट आपल्या बुध्दीचा, कौशल्याचा वापर करून प्रगती साधताहेत. हे साधं गमक निदान युवापिढीने तरी सर्व दुराग्रह दूर सारून ओळखले पाहिजे,आपल्या देशाची प्रगती आता केवळ आणि केवळ कौशल्याच्या बळावरच निर्भर आहे,वाचाळवीरांच्या नादी लागणे धोकादायक आहे हे समजून घेणेच बेहतर.बोलणाऱ्यांना बोलू द्या ते मनमोकळं करताहेत,करू द्या आणि प्रगत राष्ट्राप्रमाणे नको त्या गोष्टीत नाक न खुपसणे शिका...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com