
संदीप कुलकर्णी - saptrang@esakal.com
‘डोंबिवली फास्ट’मध्ये मी माधव आपटेची भूमिका साकारली होती. चित्रपटाची सुरुवात जशी वास्तवदर्शी आहे, तसाच तो संपूर्ण मुंबईतील संवेदनशील; पण वेदनादायक वास्तव उलगडतो. त्यानंतर माझी आवडती भूमिका म्हणजे ‘श्वास’ चित्रपटातली डॉ. मिलिंद सानेची. त्यात मी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरची भूमिका साकारली होती. ‘डोंबिवली फास्ट’मधला माधव खूप सामान्य होता, जवळचा वाटायचा; पण ‘श्वास’मधला डॉक्टर, पूर्ण वेगळा माणूस होता. त्यामुळे मला एक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली.