कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी जॉर्ज यांची आजरा भेट

कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी जॉर्ज यांची आजरा भेट

जार्ज फर्नांडिस हे एनडीए सरकारच्या काळात सरक्षणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आजरा तालुक्‍यातील "हाजगोळी बुद्रक' या छोट्या खेड्याला भेट दिली होती. त्यांच्या घरी जावून कुटुंबीयांची विचारपुस केली होती. खर्डा, नाचण्याची भाकरी, आंबाड्याची भाजी याचा आस्वाद घेतला होता. देशाचे संरक्षणमंत्री पहिल्यांदाच एका खेड्यात आल्याने त्यावेळी जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला होता. 

जनता दलाचे कार्यकर्ते व मुंबई महापालिका मजदुर युनियनचे अध्यक्ष हाजगोळी बुद्रकचे जगदीश देशपांडे व जार्ज फर्नांडिस यांची घनिष्ठ मैत्री होती. मुंबईतील पहिले रेल्वे रोको आंदोलन यावेळेपासून ते एकत्र आले. आणीबाणीच्या वेळी फर्नांडिस यांच्याबरोबर देशपांडेही भूमिगत होते. देशपांडे यांनी फर्नांडिस यांच्याबरोबर अनेक आंदोलनात सहभाग घेतला. नंतरच्या काळात देशपांडे हे फर्नांडिस यांचे खासगी सचिव म्हणून काम करत होते.

एनडीए सरकारच्या काळात संरक्षणमंत्री असतांना देशपांडे यांनी त्यांना आपल्या गावी बोलवले. त्यांच्या हस्ते  १९९९ मध्ये हाजगोळी बुद्रकमधील अंगणवाडी खोलीचे उद्‌घाटन करण्यात आले. दिवसभर त्यांच्या देशपांडे कुटुंबाच्याबरोबर गप्पा गोष्टी रमल्या होत्या. सकाळी अकरा वाजता ते हाजगोळीमध्ये आले सायंकाळी पाचपर्यंत ते हाजगोळीमध्ये होते. त्यांच्या समवेत तत्कालीन राज्यमंत्री भरमू पाटील, काशिनाथ चराटी, माधवराव देशपांडे, किरण देशपांडे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्ता कुठे नेईल तेथे....
हाजगोळी बुद्रक या गावी रस्ता नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी संरक्षणमंत्र्यांना भेट देण्याबाबत अडचणींचा अहवाल सरकारला पाठवला होता. पण फर्नांडिस यांनी "कार्यकर्ता कुठे नेईल तिकडे जाणारच 'असे अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगीतले. त्यांच्या भेटीबद्दलच्या अनेक आठवणी देशपांडे यांचे पुतणे किरण देशपांडे यांनी सांगीतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com