- मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.), mohinigarge2007@gmail.com
नाही सर, मी माझा रणगाडा मुळीच सोडणार नाही. त्यावरची मुख्य तोफ अजून शाबूत आहे, मी या शत्रूला बघतोच...' मागे फिरण्याची आज्ञा देणाऱ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सेकंड लेफ्टनंट पदावरचा एक युवा अधिकारी अपूर्व आत्मविश्वासाने सांगत होता. चहूबाजूंनी रण पेटलेलं होतं. पाकिस्तानचे रणगाडे आग ओकत पुढे सरसावत होते आणि त्यांना न जुमानता अरुण खेत्रपाल त्या एकेका रणगाड्याचा वेध घेत होता.