
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
नवीन शहरात फिरायला गेल्यानंतर तिथल्या स्थानिकांचा विश्वासाचा खाद्यअड्डा कोणता, असं विचारल्यानंतर सर्वमुखी एकच नाव येणं हे क्वचित घडतं. कोकण प्रदेशाचा मुकुटमणी असलेल्या रत्नागिरी शहरात मात्र हे सहज घडतं आणि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचते.