अशी बोलते माझी कविता (हरिश्‍चंद्र पाटील)

हरिश्‍चंद्र पाटील, ९८६०८८३६१०
रविवार, 16 एप्रिल 2017

काळीज

‘बायकूला आखिरपत्तोर साथ दिईन...
सुखाचा संसार करीन’
अशी शपथ त्यानं
लग्नात सप्तपदी घालताना
मोठ्या विश्वासानं घेतली होती...

        दुष्काळ पडला
        कर्ज काढलं
        कर्ज फिटंना
        व्याज वाढलं

गड्याचं दगडावानी बळकट काळीज
मेणावानी वितळलं
फास करून दावं फांदीला बांधलं
सुखी संसाराचं स्वप्न झाडाला टांगलं

        बायको रडली...पडली
        आणि रडता रडताच
        तिचं मेणावानी काळीज
        दगडावानी घट्ट झालं!

काळीज

‘बायकूला आखिरपत्तोर साथ दिईन...
सुखाचा संसार करीन’
अशी शपथ त्यानं
लग्नात सप्तपदी घालताना
मोठ्या विश्वासानं घेतली होती...

        दुष्काळ पडला
        कर्ज काढलं
        कर्ज फिटंना
        व्याज वाढलं

गड्याचं दगडावानी बळकट काळीज
मेणावानी वितळलं
फास करून दावं फांदीला बांधलं
सुखी संसाराचं स्वप्न झाडाला टांगलं

        बायको रडली...पडली
        आणि रडता रडताच
        तिचं मेणावानी काळीज
        दगडावानी घट्ट झालं!

Web Title: harishandra patil's poem in saptarang