सोशल मीडियावरचं गाजलेलं... (हर्षद फडके)

हर्षद फडके, ९७६५१३३९२० harshadvphadke@gmail.com
रविवार, 25 जून 2017

बसमध्ये पुढे बसलेला प्रवासी मागे बसलेल्याला ‘माफ करा; पण मी माझी रिक्‍लायनिंग सीट मागे घेतोय, चालेल ना?’ असे सौजन्याने विचारतो, असेच जपानमध्ये घडत असेल, असे आपल्या मनात असते. पण दुनिया गोल है! काही न बोलता आपली सीट धाडकन मागे घेणारे महाभाग तिथेही आहेत. त्यावरून अनेकदा भांडणेही होतात. यावर खागोशिमा राज्यातील एका ड्रायव्हरने- योशिनाओ मुरासेने- शक्कल शोधून काढलीय. तो बस सुरू करताच आवाहन करतो ः ‘‘मागे बसलेल्या प्रवाशाचा विचार करून तुम्ही सीट मागे घेण्यास संकोच करत आहात ना? सारे एकदमच सीट्‌स मागे घेऊयात. म्हणजे कुणात कटुता नको. चला!’’

जपानी लोक असे वेगळ्याच रसायनाने बनलेली असतात. नेहमी समोरच्याचा विचार. आपल्यामुळे कुणाचे काही नुकसान तर होत नाहीये ना? असा विचार. समाजासाठी हा खूप चांगला विचार वाटतो. जपानी भाषेमध्ये पण तसे शब्दप्रयोग पाहायला मिळतात. दुसऱ्याला आदर देण्यासाठीची भाषा, स्वतः ला अधिक नम्रपणे सादर करण्याची भाषा इत्यादी. आता हे सर्वच भाषांमध्ये आहे; पण जपानी भाषेत हे अधिक जाणवते. समोरचा कशी भाषा वापरतोय, यावर तो तुम्हाला किती आदर दाखवतोय हे ठरवले जाते.

याउलट अशीही शक्‍यता असते, की असे शब्द फेकून जपानी लोक सौजन्याची ‘ॲक्‍टिंग’ तर करत नाहीयेत ना? कदाचित व्यावसायिक गरज म्हणून त्यांना तसे वागावे लागत असेल. त्यामुळेच असेल; पण काही जपानी लोकांना भारतात आल्यावरच छान वाटते. ते म्हणतात ः ‘‘तुम्ही कुठेही असा, पण तुम्ही भारतीय खूप ‘नॅचरल’ वागता. रस्त्यात वागताना, सार्वजनिक ठिकाणी, घरी जिथे तुम्ही व्यक्त होता ते हृदयापासून आलेले असते.’’

असो. तर अशा या दोन संस्कृती. समोरच्याचा विचार करणेही महत्त्वाचे आणि एका दूरध्वनी सेवेच्या कंपनीचे बोधवाक्‍य होते, तसे ‘एक्‍स्प्रेस युवरसेल्फ’- स्वत:ला व्यक्त करणेही महत्त्वाचे. या दोन्हींचा समतोल राखून आपण वागले पाहिजे, नाही का?

Web Title: harshad phadke write social media poem in saptarang