Premium|Henry Kissinger China: किसिंजरची गुप्त चीन भेट: अमेरिकेच्या भू-राजकारणात मोठा बदल

Cold War: हेन्री किसिंजर हे आधुनिक भू-राजकारणातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. १९७१ मध्ये त्यांनी पाकिस्तानमार्गे गुप्तपणे चीनला भेट देत अमेरिका-चीन संबंधांची नवी सुरुवात घडवली.
Henry Kissinger China

Henry Kissinger China

sakal

Updated on

श्रीराम कुंटे - वळणं इतिहास-भूगोलाची

पाकिस्तानातून एक लष्करी विमान गुप्तपणे बैजिंगला गेल्याचं मागच्या आठवड्यातल्या लेखात आपण पाहिलं. हेन्री किसिंजर होते त्या विमानात. खरंतर त्यांच्या चिनी साहसाला १ जुलैला सुरुवात झाली. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते आधी गुआम, सायगांव, बँकॉक आणि नवी दिल्लीला जाऊन ८ जुलैला इस्लामाबादला आले. त्या रात्री स्टेट डिनरला त्यांचं पोट अचानक बिघडलं आणि त्यांनी दोन दिवस विश्रांती घ्यायचं ठरवलं. प्रत्यक्षात ९ जुलैच्या पहाटे ते एका पाकिस्तानी लष्करी विमानाने बैजिंगला गेले. या भेटीबद्दल इतकी गुप्तता पाळण्याची तीन प्रमुख कारणं होती. पहिलं म्हणजे अमेरिकेत त्या वेळी चीनविरोधी लाट होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com