Hiralal Kashidas Bhajiawala : जिभेवर रेंगाळणारी सुरती चव

Best Undhiyu in Mumbai : मुंबईतील चर्नी रोड येथील 'हिरालाल काशिदास भजीयावाला' यांनी गेल्या ९० वर्षांपासून अस्सल सुरती उंधियो, पोंख आणि गुजराती खाद्यसंस्कृतीचा चविष्ट वारसा जपला आहे.
Hiralal Kashidas Bhajiawala

Hiralal Kashidas Bhajiawala

esakal

Updated on

एकेकाळी केवळ सुरतच्या मातीशी नाते सांगणारे ‘सुरती उंधियो’ आणि ‘पोंख’ हे पदार्थ आज मुंबईच्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. ही परंपरा मुंबईत खऱ्या अर्थाने रुजवली ती म्हणजे चर्नी रोडच्या सीपी टँक परिसरातील विठ्ठलभाई पटेल रोडवरील ‘हिरालाल काशिदास भजीयावाला’ यांनी. तब्बल नव्वद वर्षांहून अधिक काळापासून येथे पदार्थाची चव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.

मुंबई हे शहर वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचं माहेरघर मानलं जातं. या शहराच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत, ज्या केवळ खाण्याच्या जागा नसून खाद्य परंपरांचा जिवंत वारसा आहेत. एखाद्या प्रदेशाची खास ओळख असलेला पदार्थ जेव्हा सर्व सीमा ओलांडतो, तेव्हा तो तिथल्या संस्कृतीचा प्रतिनिधी असतो. ‘सुरती उंधियो’ आणि ‘पोंख’ या पदार्थांच्या बाबतीत अगदी असंच घडलं आहे. एकेकाळी केवळ सुरतच्या मातीशी नाते सांगणारे हे पदार्थ आज मुंबईच्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत आणि ही परंपरा मुंबईत खऱ्या अर्थाने रुजवली ती म्हणजे चर्नी रोडच्या सीपी टँक परिसरातील विठ्ठलभाई पटेल रोडवरील प्रसिद्ध ‘हिरालाल काशिदास भजीयावाला’ यांनी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com