
Homai Vyarawalla
esakal
सकाळी उठल्या- उठल्या परीच्या हातात कॅमेरा होता. तसा तो नेहमीच असतो. मात्र, आज आईने तिला ताकीद दिली की, कॅमेरा बाजूला ठेव, दात घासून घे आणि फोटो काढण्याच्या नादात परत शाळा बुडवलीस तर याद राख! पण आई विसरली होती की, आज तर गणेश चतुर्थीची सुट्टी! मग परीने परवेजला उठवलं. आजच्या गडबडीच्या दिवसात तिला त्याची मदत लागणार होती. त्याचं काय ना, सणासुदीच्या दिवसात काढलेल्या एखाद्या धमाल फोटोसाठी श्रीयुत नखरावालांच्या वर्तमानपत्राकडून अख्खा एक रुपया मिळतो आणि तो रुपया आपण मिळवायचाच असा परीने निश्चय केला होता. तो रुपया तिला काही मजेसाठी खर्च करायचा नव्हता, तर तिला घ्यायची होती फोटोच्या फिल्मची नवी रीळं. कारण तिच्या कॅमेरात आता शेवटचा रोल उरला होता. शेवटचा रोल म्हणजे फक्त दहा फोटो!