esakal | 18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा!
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope for 18 March 2020

आजचे दिनमान
18 मार्च 2020 बुधवार

18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
18 मार्च 2020 बुधवार

मेष : तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. हितशत्रूंचा त्रास कमी होणार आहे.

वृषभ : एखादी चिंता लागून राहण्याची शक्‍यता आहे. कामामध्ये लक्ष असणार नाही. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार. आनंदी राहणार. व्यवसायात आपले पूर्ण लक्ष केंद्रित कराल.

कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. करमणुकीसाठी खर्च कराल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : बौद्धिक व कला क्षेत्रात विशेष सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. चिकाटीने कार्यरत राहाल.

कन्या : मनोबल उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल. चिकाटी वाढणार आहे. आरोग्याचा त्रास कमी होईल.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तूळ : मानसिक चिंता संपतील. प्रवास सुखकर होणार आहेत. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. प्रवासाचे योग येणार आहेत.

धनू : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. सामंजस्याने कार्यरत राहाल. कामाचा ताण कमी होईल.

मकर : खर्च वाढणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. अतिउत्साहीपणा नको. मानसिक चिंता राहील.

कुंभ : प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना विविध लाभ होतील. आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभेल.

मीन : दैनंदिन कामे विनासायास होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत.