जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 10 फेब्रुवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पंचांग 10 फेब्रुवारी 2020 
सोमवार : माघ कृष्ण 1/2, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.08, सूर्यास्त 6.32, चंद्रोदय सायंकाळी 7.44, चंद्रास्त सकाळी 8.01, गुरुप्रतिपदा, गाणगापूर गात्रा, भारतीय सौर माघ 21, शके 1941. 

दिनमान 10 फेब्रुवारी 2020 

मेष : तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. 

मिथुन : मनोबल उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहून कामे मार्गी लावू शकणार आहात. काहींना नवा मार्ग दिसेल. 

कर्क : काहींना गुप्त वार्ता समजतील. महत्त्वाच्या आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

सिंह : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. 

कन्या : आज तुम्हाला कोणत्याही कामात रस वाटणार नाही. काहींना नैराश्‍य जाणवेल. अनावश्‍यक कामे त्रासदायक होतील. 

तूळ : नवीन परिचय होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 

वृश्‍चिक : चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. मानसिक अस्वस्थता संपेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. 

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. 

मकर : कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. मनोबल कमी असणार आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो आज नकोत. 

कुंभ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. तुमचे मन नाराज राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहणार आहे. 

पंचांग 10 फेब्रुवारी 2020 
सोमवार : माघ कृष्ण 1/2, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.08, सूर्यास्त 6.32, चंद्रोदय सायंकाळी 7.44, चंद्रास्त सकाळी 8.01, गुरुप्रतिपदा, गाणगापूर गात्रा, भारतीय सौर माघ 21, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 10 February 2020