जाणून घ्या आजचे राशीभविष्य आणि पंचांग : 15 जुलै

जाणून घ्या आजचे राशीभविष्य आणि पंचांग : 15 जुलै

आजचे दिनमान
मेष : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभणार आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. एखादी मानसिक चिंता राहील. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्‍यता आहे.

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उत्साहाने वातावरण राहणार नाही. तुमचे निर्णय योग्य राहणार आहेत.

सिंह : मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. मुलामुलींच्या संदर्भातील चिंता वाढणार आहे. कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्वाला संधी लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू नका. सतत काम वाढत राहणार आहे.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही गोष्टी नशिबाने मिळणार आहेत. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

धनू : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अविचार करून काहीही साधले जात नाही. संयमाच्या कसोटीच्या काळात शांत राहणे महत्त्वाचे आहे.

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदारी शक्‍यतो टाळाव्यात. लोकांचे आदरातिथ्य करण्यात वेळ जाईल.

मीन : व्यवसायाकरिता अधिक कष्ट घ्याल. मात्र, मुलांची प्रगती चांगली राहणार आहे. विद्यार्थ्यांना व बौद्धिक क्षेत्रात चांगले यश मिळेल.

पंचांग 15 जुलै 2019

आषाढ शुद्ध 14, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.08, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय सायंकाळी 6.03, चंद्रास्त पहाटे 4.35, भारतीय सौर आषाढ 24, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com