जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 16 नोव्हेंबर

bhavishya
bhavishya

दिनमान 16 नोव्हेबर 2019 

मेष : तुमच्या क्षेत्रात तुम्हाला योग्य ती संधी लाभणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. विरोधकावर मात कराल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

मिथुन : तुमची पावले योग्य दिशेने पडत आहेत. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. बॅंकिंग, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

कर्क : कामाचा ताण वाढणार आहे. दगदग वाढणार आहे. जबाबदारी वाढेल. 

सिंह : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. ग्रहमान विशेष अनुकूल आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. 

कन्या : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. पगारवाढीची शक्‍यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. तुमच्या कार्यात अनेकांची साथ लाभणार आहे. 

वृश्‍चिक : यशासाठी थोडे थांबावे लागणार आहे. ग्रहमान बरेचसे प्रतिकूल आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. 

धनू : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. मित्रांचे, थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. 

मकर : एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे. मानसिक ताणतणाव राहतील. मात्र, मनोबलाच्या जोरावर अडचणीवर मात कराल. 

कुंभ : हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

मीन : अडचणी जाणवणार आहेत. यशासाठी थोडे थांबावे लागणार आहे. सध्या कोणाच्याही सहकार्याची, मदतीची अपेक्षा करू नका. 

पंचांग 16 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक कृष्ण 4, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.44, सूर्यास्त 5.56, चंद्रोदय रात्री 9.13, चंद्रास्त सकाळी 10.01, महालय समाप्ती, भारतीय सौर कार्तिक 25, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com