जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान 18 जानेवारी 2020 
मेष : दिवस अनुकूल आहे. अनेक कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ : मनोबल कमी राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणे गरजेचे आहे. अस्वस्थता जाणवणार आहे. 

मिथुन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. 

कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. 

सिंह : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. काहींना नवी दिशा सापडेल. 

कन्या : महत्त्वाच्या आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. 

तूळ : आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. 

वृश्‍चिक : अनावश्‍यक कामात वेळ वाया जाणार आहे. महत्त्वाच्या व दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

धनू : अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. 

मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. 

कुंभ : काहींना नवा मार्ग दिसेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल उत्तम राहील. 

मीन : मानसिक अस्वस्थता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. अपेक्षित कामे होणार नाहीत. 

पंचांग 18 जानेवारी 2020 
शनिवार : पौष कृष्ण 9, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.19, चंद्रोदय रात्री 12.57, चंद्रास्त दुपारी 1.02, भारतीय सौर पौष 28, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com