जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 1 जुलै

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 July 2019

पंचांग, 1 जुलै 
सोमवार : ज्येष्ठ कृष्ण 14, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.03, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय पहाटे 4.24, चंद्रास्त सायंकाळी 5.58, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ 10, शके 1941. 

आजचे दिनमान 
मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. मनोबल व इच्छाशक्‍तीच्या जोरावर अडचणीवर मात कराल. मनोरंजनावर अधिक खर्च कराल. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. 

वृषभ : साडी सेंटर्स, ज्वेलर्स, केटरिंग यांना आर्थिक लाभ होतील. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. विरोधकावर मात कराल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. 

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात गतिमानतेने प्रगती होईल. नोकरीत तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. खर्च करण्याकडे कल राहील. दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. 

कन्या : नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. मित्रांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे. 

तुळ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. व्यवसायात धाडसाने निर्णय घ्याल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात नवीन प्रयोग करण्यास व नवीन तंत्र, मंत्र अमलात आणण्यास दिवस चांगला आहे. 

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. कोणाच्याही भरवशावर अवलंबून राहू नका. खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. 

मकर : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष सफलता लाभणार आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. शत्रुपिडा नाही. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. 

मीन : उत्साह, उमेद वाढेल. आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. आपले विचार व आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

पंचांग, 1 जुलै 
सोमवार : ज्येष्ठ कृष्ण 14, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.03, सूर्यास्त 7.16, चंद्रोदय पहाटे 4.24, चंद्रास्त सायंकाळी 5.58, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ 10, शके 1941. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horoscope and panchang for 1st July