जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 नोव्हेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 नोव्हेंबर

दिनांक : 2 नोव्हेबर 2019 : वार : शनिवार 
आजचे दिनमान 

मेष : प्रवासात काळजी हवी. महत्त्वाच्या कामात दक्षता हवी. वाहने सावकाश चालवावीत. 

वृषभ : कोणती ना कोणती तरी चिंता सतावेल. महत्त्वाची कामे आज नकोत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

मिथुन : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. भागीदारी व्यवहारात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे विलंबाने होतील. 

कर्क : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन आज नको. प्रवास नकोत. 

सिंह : महत्त्वाचे नियोजन आज नको. त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. तुमचा बौद्धिक संभ्रम राहील. 

कन्या : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. गुंतवणुकीची कामे आज नकोत. 

तूळ : नातेवाइकांबरोबर मतभेद संभवतात. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काळजीपूर्वक कार्यरत रहावे. आपल्या हातून चूक होण्याची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवनात किरकोळ मतभेद संभवतात. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. 

धनू : अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतात. तुमचे मन नाराज राहण्याची शक्‍यता आहे. 

मकर : आर्थिक व्यवहारामध्ये नुकसानीची शक्‍यता आहे. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. 

कुंभ : प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. 

मीन : शांत व संयमी रहावे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे आज नकोत. अस्वस्थता राहील. 

पंचांग 2 नोव्हेंबर 2019 
शनिवार : कार्तिक शुद्ध 6, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.37, सूर्यास्त 6.01, चंद्रोदय सकाळी 11.25, चंद्रास्त रात्री 10.48, भारतीय सौर कार्तिक 11, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com