जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 2 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941. 

दिनांक : 2 ऑक्‍टोबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. 

वृषभ : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रांची विशेष मदत लाभेल. 

मिथुन : आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक उत्साह वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसाय वाढेल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

सिंह : नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कला, संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रात सुसंधी लाभेल. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

तूळ : परिस्थिती थोडी बदलणार आहे. हळूहळू अडचणी कमी होणार आहेत. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. 

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार नकोत. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

मकर : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभेल. तुमची प्रगती गतिमानतेने होत राहणार आहे. 

कुंभ : परिस्थिती थोडी बदलली आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

मीन : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

पंचांग 2 ऑक्‍टोबर 2019 
बुधवार : आश्‍विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.23, चंद्रोदय सकाळी 9.49, चंद्रास्त रात्री 9.35, विनायक चतुर्थी, ललिता पंचमी, भारतीय सौर आश्‍विन 10, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 2 October 2019