जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 जुलै

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 जुलै

आजचे दिनमान ]
मेष : मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. काहींना नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

वृषभ : व्यवसायातील घडामोडींकडे नीट लक्ष देवू शकाल. प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही प्रस्ताव नव्याने समोर येतील. 

मिथुन : सहकारी वर्गाची अपेक्षित मदत मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे मार्गी लागतील. 

कर्क : तुमच्या बौद्धिक व वैचारिक जीवनावर अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

सिंह : काहींचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील. नको त्या कारणासाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. 

कन्या : मन आशावादी राहील. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. उत्साह व मनोबल वाढेल. 

तूळ : व्यवसायामध्ये भरभराटीचे व प्रगतीचे वातावरण. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्हाला हवे असे पोषक वातावरण मिळेल. 

वृश्‍चिक : व्यवसायातील महत्त्वाची कामे हळूहळू मार्गी लागणार आहेत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 

धनू : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करावा. 

मकर : काही गुप्त गोष्टींचा उलगडा होण्याची शक्‍यता. काहींना मुलामुलींच्या बाबतीत चिंता लागून राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ : तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधावा. 

मीन : धार्मिक क्षेत्रात यश लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्य चांगले राहणार. 

पंचांग
शनिवार : आषाढ कृष्ण 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.09, सूर्यास्त 7.14, चंद्रोदय रात्री 9.46, चंद्रास्त सकाळी 8.53, संकष्ट चतुर्थी, सूर्याचा पुण्य नक्षत्रप्रवेश, वाहन गाढव, भारतीय सौर आषाढ 29, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 20 July 2019