जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 सप्टेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 20 सप्टेंबर

दिनांक : 20 सप्टेंबर 2019 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 

मेष : आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. यशाचे प्रमाण सर्वसामान्य असणार आहे. 

वृषभ : आजचा दिवस आपणाला अत्यंत चांगला आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात सावधानतेने व्यवहार करावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

कर्क : महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला दिशा सापडेल. अनेकांचे संपर्क होणार आहेत. 

सिंह : मनोबल व उत्साह वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आर्थिक क्षेत्रात फार मोठे यश लाभेल. 

कन्या : नवी दिशा सापडेल, सामाजिक व सार्वजनिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 

तूळ : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात सामान्य स्थिती राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

वृश्‍चिक : प्रसन्नतेचा दिवस आहे. कौटुंबिक जीवनात कमालीची शांतता लाभणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळेल. 

धनू : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. सध्या धनू व्यक्‍तींना ग्रहस्थिती अनुकूल आहे. साडेसातीचा प्रभाव कमी-अधिक राहणार आहे. 

मकर : महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. उत्साहाने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी व्हाल. 

कुंभ : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. प्रवास सुखकारक होणार आहेत. आता अनपेक्षित अडचणी येत राहणार आहेत. 

मीन : प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकारक होतील. अडचणी कमी होणार आहेत. 

पंचांग 20 सप्टेंबर 2019 
शुक्रवार : भाद्रपद कृष्ण 6, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.33, चंद्रोदय रात्री 10.46, चंद्रास्त सकाळी 11.20, षष्ठी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद 29, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com