जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय अचूक ठरतील. 

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. मनोरंजनासाठी खर्च होईल. 

मिथुन : तुमचे प्रश्‍न मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. 

कर्क : व्यवसायात विशेष यश मिळेल. आर्थिक लाभही मनासारखे होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

सिंह : सार्वजनिक, सामाजिक कार्यात यश लाभेल. सामाजिक व धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. सढळ हाताने खर्च कराल. 

कन्या : मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. सध्या कोणाचेही सहकार्य लाभणार नाही. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. 

तूळ : उत्साह, उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. संपूर्ण दिवस उत्साहाने कार्यरत रहाल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. सामाजिक कार्यात सतत तुमचा प्रभाव राहणार आहे. आत्मविश्‍वास, जिद्द वाढेल. 

धनू : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शासकीय कामात यश मिळेल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. 

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक व्यवहार करताना सावधानपणा हवा. वाहने चालवताना काळजी हवी. 

कुंभ : वेगवान कृती करून यश मिळवाल. लोकांबरोबर संपर्क ठेवून अनेक कामे हातावेगळी कराल. नोकरी, व्यवसाय सर्व क्षेत्रात यश मिळणार आहे. 

मीन : महत्त्वाचे निर्णय घेऊन ठेवा. सर्व क्षेत्रात जागरूकता हवी. फक्‍त आरोग्याची साथ चांगली आहे. 

पंचांग 21 ऑगस्ट 2019 
बुधवार : श्रावण कृष्ण 6, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.19, सूर्यास्त 6.58, चंद्रोदय रात्री 10.44, चंद्रास्त सकाळी 10.50, भारतीय सौर श्रावण 30, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com