जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान : 21 जानेवारी 2020 

मेष : मनोबल कमी राहणार आहे. प्रतिकूलता जाणवेल. दैनंदिन कामात व महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवणार आहेत. 

वृषभ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : प्रवास टाळावेत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. अतिरिक्‍त खर्च वाढणार आहेत. 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरतील. 

सिंह : तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सार्वजनिक कामात सहभागी व्हाल. 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावाल. 

तूळ : नोकरी, व्यवसायात आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. उधारी, उसनवारी वसूल होईल. 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. 

धनू : प्रवासाचे योग येतील. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. 

मकर : प्रवास सुखकर होतील. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. 

कुंभ : सार्वजनिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. मानसन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढेल. 

मीन : काहींना नवा मार्ग दिसेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. 

पंचांग 21 जानेवारी 2020 
मंगळवार : पौष कृष्ण 12, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.21, चंद्रोदय पहाटे 3.51, चंद्रास्त दुपारी 3.21, भारतीय सौर माघ 1, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com