जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 21 जून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 June 2019

मेष : कर्मचारी वर्गाबरोबर जर मतभेद असतील तर ते मिटविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. एखादी चांगली महत्त्वाची बातमी समजेल.

वृषभ : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होणार आहेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. विमा, बॅंकिंग या क्षेत्रात विशेष यश मिळेल. तसेच वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात चांगले वातावरण राहील.

मेष : कर्मचारी वर्गाबरोबर जर मतभेद असतील तर ते मिटविण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात चांगली स्थिती राहणार आहे. एखादी चांगली महत्त्वाची बातमी समजेल.

वृषभ : अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होणार आहेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. विमा, बॅंकिंग या क्षेत्रात विशेष यश मिळेल. तसेच वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रात चांगले वातावरण राहील.

मिथुन : एखादी गोष्ट नव्याने समजेल. आर्थिक क्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. मनोरंजनावर अधिक खर्च होणार आहे. हितशत्रुंचा त्रास राहणार आहे.

कर्क : खर्च करण्याकडे कल होणार आहे. आरोग्याच्या कटकटी कमी होणार आहेत. तुमचे अनुभवाचे क्षेत्र व्यापक होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

सिंह : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मित्रांच्यावर अवलंबून राहू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत. व्यवसायात मात्र चांगली स्थिती राहील व एकूणच स्वास्थ्य राहणार आहे.

कन्या : हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. नवीन परिचय होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. वृत्तपत्र, शैक्षणिक, विमा, बॅंकिंग या क्षेत्रात विशेष यश मिळणार आहे.

तुळ : आपल्या बुद्धिचातुर्याने व्यवसाय वाढवाल. शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्ही गतिमानतेने कामे पार पाडल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणण्यास दिवस चांगला आहे.

वृश्‍चिक : तुमचे अनुभवाचे विश्‍व व्यापक होणार आहे. आपली मते व विचार इतरांना पटवून द्याल. काही गोष्टी नव्याने समजतील. काही गोष्टी समजल्याने ज्ञानात भर पडेल.

धनु : आर्थिक क्षेत्रात चांगली संधी लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. भागीदारी व्यवसायात मतभेद शक्‍यतो टाळावेत.

मकर : तुमच्या वैचारिक व मानसिक विश्‍वात अनुकूल परिवर्तन होईल. वैवाहिक जीवनात सामंजस्य निर्माण होणार आहे. अनेक मित्र व हितचिंतक यांची मदत होईल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कोणाच्याही व्यक्‍तिगत जीवनात भाग घेवू नका. तुमची प्रॉपर्टीची कामे असतील तर ती उरकून घ्यावीत.

मीन : विद्यार्थ्यांना विशेष यश मिळणार आहे. ज्या प्रतिसादाराची अपेक्षा करत आहात तो प्रतिसाद लाभणार आहे. कामे मार्गी लागतील. मुलामुलींची वेगाने प्रगती होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 21 June 2019