जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : ग्रहांची अनुकूलता आहे. नवे स्नेहसंबंध जुळतील. मुलामुलींच्या प्रश्‍नांकडे विशेष लक्ष द्याल. 

वृषभ : अकारण खर्चावर नियंत्रण हवे. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायात चांगली स्थिती राहील. 

मिथुन : अनेक कामे हातावेगळी करण्यात यश मिळवाल. आर्थिक क्षेत्रात नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. 

कर्क : आर्थिक क्षेत्रात विक्रमी यश मिळणार आहे. व्यवसायाची उलाढाल अपेक्षेपेक्षा वाढेल. 

सिंह : मनोरंजन, कला, संगीत या क्षेत्रांत अपूर्व यश मिळेल. अडलेली शासकीय कामे मार्गी लागणार आहेत. 

कन्या : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. व्यवसायात नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे. 

तुळ : आर्थिक क्षेत्रात नवीन संबंध प्रस्थापित कराल. सध्या प्रत्येक गोष्टीत हवे ते घडणार आहे. 

वृश्‍चिक : आत्मविश्‍वास जिद्द व मनोबल यामुळे यश यश खेचून आणाल. आपली मते इतरांच्यावर लादाल. 

धनु : अधिकारावर असणाऱ्या व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. साडेसातीमुळे मनावर आलेली काजळी कमी होईल. 

मकर : मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. 

कुंभ : शासकीय कामात यश लाभणार आहे. एखादी अधिकाराची जागा मिळेल. कर्तृत्वाला संधी लाभणार आहे. 

मीन : उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्जप्रकरणे मंजूर होतील. प्रॉपर्टीची कामी मार्गी लागतील. 

पंचांग 22 ऑगस्ट 2019 
गुरुवार : श्रावण कृष्ण 6, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.20, सूर्यास्त 6.57, चंद्रोदय रात्री 11.22, चंद्रास्त सकाळी 11.40, भारतीय सौर श्रावण 31, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com