जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 22 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान 22 जानेवारी 2020 
मेष : नवा मार्ग दिसेल. आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. कामे मार्गी लागणार आहेत. 

वृषभ : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. वादविवादात सहभाग टाळावा. आज आपणाला प्रतिकूलता संभवते. 

मिथुन : उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कामे मार्गी लागतील. 

कर्क : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाच्या कामाचे नियोजन आज नको. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. 

सिंह : प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कन्या : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व उत्साही राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 

तूळ : नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आनंदी रहाल. 

धनू : मनोबल उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साहाने कार्यरत रहाल. 

मकर : चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. काहींना दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. निरुत्साही रहाल. 

कुंभ : काहींना विविध लाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन योग्य ठरेल. 

मीन : तुमचा प्रभाव वाढणार आहे. सार्वजनिक कामात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सर्वत्र तुमचा दबदबा राहील. 

पंचांग 22 जानेवारी 2020 
बुधवार : पौष कृष्ण 13, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 7.13, सूर्यास्त 6.21, चंद्रोदय पहाटे 4.58, चंद्रास्त दुपारी 16.12, प्रदोष, भारतीय सौर माघ 2, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com