जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 सप्टेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 सप्टेंबर

दिनांक : 24 सप्टेंबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे आज उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसायात नवीन प्रयोग किंवा नवीन तंत्र मंत्र अंमलात आणण्यास दिवस चांगला आहे. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात संमिश्र स्थिती आहे. 

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. तुमच्या वैचारिक किंवा बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. 

सिंह : महत्त्वाची व शुभ कामे नकोत. व्यवसायात आर्थिक प्राप्ती होईल. मात्र, धाडस करताना अधिक विचार करावा. 

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. 

तूळ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवासाचे योग येतील. 

वृश्‍चिक : कर्तृत्त्वाला संधी मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. 

धनू : महत्त्वाची व शुभ कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. शैक्षणिक व बौद्धिक कार्यात यश लाभेल. 

मकर : प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात असामान्य यश लाभणार आहे. जनसंपर्क वाढेल. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक़ लाभाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

मीन : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

पंचांग 24 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद कृष्ण 10, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.29, चंद्रोदय रात्री 1.27, चंद्रास्त दुपारी 3.07, दशमी श्राद्ध, भारतीय सौर आश्‍विन 2, शके 1941. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com