जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 जून

rashibhavishya
rashibhavishya

मेष : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. दानधर्माकरिता खर्च होईल. एखादी गुप्त व महत्त्वाची बातमी समजेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. अनेक कामे मार्गी लागल्याचे समाधान लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या आशाआकांक्षा सफल होणार आहेत.

मिथुन : व्यवसायात मोठी उलाढाल होवू शकेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरणार आहेत. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील.

कर्क : काहींच्या मानसिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. सर्व क्षेत्रात गतिमानतेने प्रगती होईल. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल.

सिंह : दानधर्माकरिता खर्च कराल. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो पुढे ढकलावेत. नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.

कन्या : अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीमध्ये एखादी चांगली जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

वृश्‍चिक : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मानसिक व शारीरिक उत्साह वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात अत्यंत आनंदाचे व सौख्याचे वातावरण राहणार आहे.

धनु : अकारण होणाऱ्या खर्चाला आळा बसेल. वैचारिक प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

मकर : जीवनाला एक चांगले वळण लाभेल. कोणत्या दिशेने जायचे हे समजेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सामाजिक, सार्वजनिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. काहींचे राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. विरोधकावर मात कराल.

मीन : कौटुंबिक जीवनात एक उत्साहाचे, आनंदाचे वातावरण राहील. महत्त्वाचे निर्णय आज घेवून टाका. आजचा दिवस हा साफल्याचा आहे, यशाचा आहे. कटू बोलणे टाळावे.

पंचांग :

मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण 8, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय रात्री 12.24, चंद्रास्त दुपारी 12.45, कालाष्टमी, भारतीय सौर आषाढ 4, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com