जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 मे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 24 मे

आजचे दिनमान 
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे. 

वृषभ : योग्य मार्गदर्शन करू शकाल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

मिथुन : एखादी मानसिक चिंता राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात अपेक्षेसारखी आवक राहणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्यावयास हवे. 

कर्क : नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. एखादी चांगली बातमी मिळणार आहे. सर्वत्र यश, सफलता लाभेल. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकाल. 

कन्या : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. भाग्यकारक घटना यामुळे दिवस उजळून जाणार आहे. अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. 

तूळ : कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात मनासारखे वातावरण राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : चांगली बातमी समजणार आहे. तुमच्या कामामध्ये अनेकांची मदत लाभणार आहे. प्रवास सुखकारक होतील. 

धनू : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. जुने येणे वसूल होईल. 

मकर : कार्यक्षेत्रात विशेष यश मिळेल. अनेकांचा विश्‍वास संपादन कराल. वाटचाल करत असलेली दिशा योग्य आहे. 

कुंभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. मौल्यवान हरविण्याची शक्‍यता आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

मीन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळणार आहे. अनेक कामे निकाली काढू शकाल. 

पंचांग
शुक्रवार : वैशाख कृष्ण 6, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.05, चंद्रोदय रात्री 11.53, चंद्रास्त सकाळी 10.38, भारतीय सौर ज्येष्ठ 3, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 25 May 2019