जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 ऑगस्ट

bhavishya
bhavishya

आजचे दिनमान 
मेष : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे व्यवहार टाळावेत. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

वृषभ : आर्थिक प्रगती होईल. मात्र, आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्य चांगले राहील. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रातील व्यवहार जपून करावेत. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. 

कर्क : आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

सिंह : मित्रांच्यासाठी खर्च कराल. खर्च अकारण होण्याची शक्‍यता आहे. आर्थिक लाभ होतील. 

कन्या : मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. व्यवसायात अडचणी जाणवतील. प्रत्येक गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. 

तूळ : व्यवसायात जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. शासकीय कामात यश लाभेल. 

वृश्‍चिक : प्रवास टाळावेत. कामे विलंबाने होणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. 

धनू : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात मतभेद वाढतील. वाहने चालवताना काळजी हवी. 

मकर : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. मुलामुलींच्या समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. कामे विलंबाने होणार आहेत. 

पंचांग 26 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण कृष्ण 10/11, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.54, चंद्रोदय रात्री 1.43, चंद्रास्त दुपारी 3,24, अजा (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर भाद्रपद 4, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com