जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : २७ डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आजचे दिनमान 

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे योग येतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

आजचे दिनमान 

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे योग येतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. 

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

मिथुन : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अनुकूलता लाभेल. 

कर्क : कौटुंबिक जीवनात समाधानकारक वातावरण राहील. एखादी गुप्त बातमी समजेल. व्यवसायामध्ये नवीन उलाढाल करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. 

कन्या : काहींना नैराश्‍य जाणवेल. आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो टाळावेत. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रतिकूलता जाणवेल. 

तूळ : मुलामुलींसाठी जादा खर्च करावा लागेल. मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. 

वृश्‍चिक : तुमच्या राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 
 

धनु : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

मकर : प्रवासामध्ये शक्‍यतो दक्षता घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. वादविवादात सहभाग टाळावा. मनोबल कमी राहणार आहे. मानसिक अस्वस्थता जाणवतेल. 

कुंभ : भागीदारी व्यवसायातील कटकटी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. मन आनंदी व आशावादी राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. 

मीन : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे तसेच महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

पंचांग
गुरुवार : मार्गशीर्ष कृ. 5/6, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 7.07, सूर्यास्त 6.05, चंद्रोदय रा. 11.02, चंद्रास्त स. 11.12, भारतीय सौर पौष 6, शके 1940. 

दिनविशेष 

  • 1995 : कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल भारताचे डॉ. एस. के. नुरुद्दीन आणि ब्रिटनच्या जीन वॅटसन यांना गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर. 
  • 1996 : प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्‍वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 
  • 2007 : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान आणि लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या नेत्या बेनझीर भुट्टो यांची दहशतवाद्यांनी रावळपिंडीत लियाकत बागेतील जाहीर सभेत निर्घृण हत्या केली.
Web Title: Horoscope And Panchang Of 26 December 2018