जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पंचांग 27 ऑगस्ट 2019 
मंगळवार : श्रावण कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.54, चंद्रोदय रात्री 2.41, चंद्रास्त दुपारी 4.24, भागवत एकादशी, भारतीय सौर भाद्रपद 5, शके 1941. 
 

आजचे दिनमान 
मेष : तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. कलेच्या क्षेत्रात विशेष प्रगती होईल. तुम्ही आपली मते व विचार इतरांना पटवून देऊ शकाल. 

वृषभ : आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याची साथ लाभणार आहे. यशाची चढती कमान राहील. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. 

मिथुन : व्यवसायात सावधगिरीने व्यवहार करावेत. मनोरंजनावर खर्च वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

कर्क : एखाद्या प्रश्‍नाची चिंता राहणार आहे. कामात उत्साह राहणार नाही. व्यवसायात आर्थिक लाभ चांगले राहतील. 

सिंह : दानशूरपणा वाढणार आहे. खर्च करताना विचारपूर्वक खर्च करावेत. मात्र, सर्व क्षेत्रात तुमची आगेकूच वेगाने राहणार आहे. 

कन्या : परिस्थिती संमिश्र राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात फार मोठे यश मिळणार नाही. नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे. 

तूळ : अनुकूल ग्रहमानाचा व सुसंधीचा फायदा करून घ्यावा. व्यवसायात तुम्ही जितके लक्ष घालाल तेवढा लाभ होणार आहे. 

वृश्‍चिक : महत्त्वाच्या कामासाठी उद्यापर्यंत थांबावे. आजचा दिवस थोडासा त्रासाचा आहे. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. 

धनू : प्रत्येक कामात सावधानता हवी. एखादी गोष्ट मनाविरुद्ध होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी व प्रसिद्धी मिळणार आहे. 

मकर : काही व्यक्‍तींना अडचणी राहणार आहेत. मित्र, सहकारी, वरिष्ठ यांच्यावर अवलंबून राहू नका. प्रत्येक बाबतीत धाडस टाळावे. 

कुंभ : उत्साहाने, उमेदीने दिवसभर कार्यरत राहाल. सध्या जे जे हातात घ्याल त्यात यश मिळवाल. ग्रहांची जबरदस्त साथ आहे. 

मीन : पावले वेगाने टाकू नका. कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा. वैवाहिक जीवनात मतभेद राहणार आहेत. 

पंचांग 27 ऑगस्ट 2019 
मंगळवार : श्रावण कृष्ण 12, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.21, सूर्यास्त 6.54, चंद्रोदय रात्री 2.41, चंद्रास्त दुपारी 4.24, भागवत एकादशी, भारतीय सौर भाद्रपद 5, शके 1941. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 27 August 2019