जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 मे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 मे

आजचे दिनमान 
मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

वृषभ : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उत्साह, उमेद वाढेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. 

मिथुन : काही निर्णय धाडसाने घ्याल. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. आरोग्याकडे फार दुर्लक्ष नको. 

कर्क : प्रवास शक्‍यतो टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. तुमच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा होईल. प्रगती वेगाने होईल. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. जबाबदारी वाढणार आहे. वाहने चालवताना विशेष दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 

वृश्‍चिक : व्यवसायात अपेक्षेप्रमाणे वाढ होणार आहे. नोकरीतही प्रगतीला पोषक वातावरण राहणार आहे. मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. 

धनू : नवे स्नेहसंबंध जुळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. साडेसातीची तीव्रता जाणवणार आहे. 

मकर : आर्थिक कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. नवीन परिचय होतील व गाठीभेटी होतील. 

कुंभ : व्यवसायात चांगल्या घटना घडतील. कला, संगीत, नाट्य क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. 

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. उसनवारी वसूल होईल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. 

पंचांग
सोमवार : वैशाख कृष्ण 8, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.06, चंद्रोदय रात्री 1.13, चंद्रास्त दु. 1.08, भारतीय सौर ज्येष्ठ 6, शके 1941


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 27 May 2019