जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 जून

Rashi Bhavishya
Rashi Bhavishya

आजचे दिनमान 
मेष : शासकीय कामात यश मिळेल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष लाभ होणार आहेत. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

वृषभ : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. 

मिथुन : दररोजच्या व्यवहारात तडजोडीचे धोरण हवे. दैनंदिन व्यवहारात ताठरपणा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

कर्क : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रवासात विशेष दक्षता हवी. कटू बोलण्यामुळे शत्रुत्व पत्करावे लागेल. 

सिंह : ग्रहमान अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. जबाबदारी वाढणार आहे. 

तूळ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. 

वृश्‍चिक : प्रवास सुखकर होणार आहेत. शासकीय कामात यश लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. 

धनू : दिवस अतिशय प्रतिकूल आहे. व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. पत्नीचे आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. 

मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

कुंभ : वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे. 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. भागीदारी व्यवसायात मतभेद वाढणार आहेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

पंचांग
सोमवार : वैशाख कृष्ण 30, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.09, दर्श भावुका अमावास्या, शनैश्‍वर जयंती, सोमवती अमावास्या, भारतीय सौर ज्येष्ठ 13, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com