जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 31 मार्च

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

आजचे पंचांग
मंगळवार : चैत्र शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 11.09, चंद्रास्त रात्री 12, भारतीय सौर चैत्र 11, शके 1942

दिनांक : 31 मार्च 2020 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : उत्साह वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित प्रवास होतील. 

वृषभ : आर्थिक कामांसाठी दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. रखडलेली शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायात अपेक्षित धनलाभ होईल. गुप्त वार्ता समजतील. 

मिथुन : तुमचे मनोबल वाढेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे पूर्ण होतील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. 

कर्क : आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. काहींना दैनंदिन कामातही अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

सिंह : काहींना विविध लाभ होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. गेले काही दिवस रखडलेली शासकीय कामे आता मार्गी लागणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवास होतील. 

कन्या : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे होणार आहेत. शासकीय कामे होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. प्रवास सुखकर होतील. 

तुळ : मनोबल वाढणार आहे. अस्वस्थता कमी होईल. अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. 

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना मनस्तापदायक घटनांना सामोरे जावे लागेल. प्रवासात व वाहने चालवताना काळजी घ्यावी. आर्थिक लाभ होतील. अडचणी जाणवतील. 

धनु : अस्वस्थता कमी होईल. अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. प्रवास सुखकर होतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. 

मकर : प्रवासात काळजी घ्यावी. काहींचा अनावाश्‍यक कामात वेळ वाया जा ईल. खर्च वाढणार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण राहील. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील. अस्वस्थता कमी होईल. काहींना विविध लाभ होतील. आर्थिक लाभास दिवस अनुकूल आहे. 

मीन : आशावादीपणे कार्यरत रहाल. एखादी आनंददायी घटना घडेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मानाचे योग येतील.

आजचे पंचांग
मंगळवार : चैत्र शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 11.09, चंद्रास्त रात्री 12, भारतीय सौर चैत्र 11, शके 1942


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 31 March 2020