जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 31 मे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 31 मे

आजचे दिनमान 
मेष : उत्साह, उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : मनस्थिती सामान्य राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासात विशेष दक्षता हवी. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल. कलाकारांना विशेष संधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

कर्क : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल. काही निर्णय धाडसाने घ्याल. 

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. 

कन्या : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नये. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. कला व मनोरंजनाच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. शुभ कामासाठी खर्च होतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 

धनू : संततिसौख्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

मकर : प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. 

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल व प्रसिद्धी लाभेल. कलाकारांना विशेष यश लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. 

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

पंचांग
शुक्रवार : वैशाख कृष्ण 12, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.08, चंद्रोदय पहाटे 3.36, चंद्रास्त दुपारी 4.25, प्रदोष, भारतीय सौर ज्येष्ठ 10, शके 1941.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 31 May 2019