जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 नोव्हेंबर

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 6 नोव्हेंबर

दिनांक : 6 नोव्हेबर 2019 : वार : बुधवार 
आजचे दिनमान 

मेष : महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूलता लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नवीन परिचय होतील. 

वृषभ : सर्वत्र तुमचा प्रभाव व दबदबा राहणार आहे. आज आपणाला अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. 

मिथुन : तुमच्यामध्ये असणारी सकारात्मकता वाढेल. मानसिक अस्वस्थता संपेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. 

कर्क : आज आपणाला कामे नकोशी होतील. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

सिंह : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुम्हाला प्रसन्नता लाभेल. 

कन्या : अस्वस्थता राहणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये सावध रहावे. वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : जुन्या आठवणींना उजाळा देवू शकाल. मित्रमैत्रिणी भेटतील. महत्त्वाच्या कामाचे नियोजन करणे योग्य ठरेल. 

वृश्‍चिक : आनंदी राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारा आशावाद वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

धनू : नातेवाइकांबरोबर असलेले मतभेद संपतील. काहींना गुरूकृपा लाभेल. उचित मार्गदर्शन लाभेल. 

मकर : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायातील उधारी, उसनवारीची कामे पार पडतील. अनपेक्षित धनलाभ होईल. 

कुंभ : सकारात्मकता वाढणार आहे. गेले दिवस जाणवत असणाऱ्या अडचणी आता कमी होणार आहेत. अनुकूलता लाभणार आहे. 

मीन : महत्त्वाच्या कामांचे नियोजन आज नको. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.काहींना नैराश्‍य जाणवेल. 

पंचांग 6 नोव्हेंबर 2019 
बुधवार : कार्तिक शुद्ध 9, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 6.39, सूर्यास्त 5.59, चंद्रोदय दुपारी 2.23, चंद्रास्त रात्री 1.24, भारतीय सौर कार्तिक 15, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com