प्रेमाची तऱ्हाच न्यारी!

प्रेमाची तऱ्हाच न्यारी!

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी गुलाब देऊन तर कोणी प्रपोज करून आपल्यापरीने आपलं प्रेम व्यक्त करतात. ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत देशापरत्वे बदलताना दिसते. पाहूया हा दिवस कोणत्या देशात कशा प्रकारे साजरा केला जातो. 

संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 14 फेब्रुवारी हा प्रेमदिन संपूर्ण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. आता तर तो जागतिक प्रेमोत्सव झाला आहे, असं म्हटलं तरी चालेल. काळानुरूप व्हॅलेंटाईन डेचे स्वरूप बदलत गेले आहे. आजची तरुणाई संत व्हॅलेंटाईनचे गोडवे गात दणक्‍यात व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन करतात. भारतातलं सेलिब्रेशन सर्वांना माहीतच आहे. पण, 'देश तसा वेश' या उक्तीप्रमाणे प्रेमदिवस जगात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 

  • चीनमध्ये प्रेमदिवस हा इतर देशांपेक्षा अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. चीनच्या दिनदर्शिकेनुसार सातव्या लुनार महिन्यातील 7 तारखेला प्रेमदिन साजरा केला जातो. विविध प्रकारची गिफ्ट्‌स, फुलं, जंगी सेलिब्रेशन करण्यापेक्षा येथील प्रेमीयुगुल 'टेंपल ऑफ मॅचमेकर' या मंदिरात जाऊन त्यांच्या इच्छा बोलून दाखवतात.
  • अमेरिकेमध्ये प्रेमदिन हा एका उत्सवाप्रमाणे जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. या वेळी भेटवस्तू, शुभेच्छा पत्र, चॉकलेट यांची विक्रमी खरेदी होते; तर रोमॅन्टिक मूव्हीज, गाणी, तसेच दिवसभर मॉलमध्ये संगीतसंध्या आणि इतर खेळांचे आयोजन केले जाते. 
  • दक्षिण आफ्रिकेमध्ये पर्यटनासाठी अनेक सुंदर जागा आहेत. त्यामुळे प्रेमदिनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होऊन निसर्गरम्य ठिकाणी आपल्या व्हॅलेंटाईनसोबत वेळ व्यतीत करतात. पुरातन रोमन फेस्टिव्हल पद्धतीप्रमाणे मुली त्यांच्या आवडत्या व्यक्तीचे नाव ड्रेसच्या बाह्यांवर शिवून घेतात.
  • डेन्मार्कमध्ये परंपरेचे पालन करून प्रेमदिन साजरा केला जातो. प्रेमाचा संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र, हिमकणांचे प्रतीक म्हणून पांढरी फुलं, गाईकेब्रेस म्हणजे विनोदी कवितांचा प्रकार आणि भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी प्रेमकविता लिहिली जाते. मुलीने ही कविता कोणी लिहिली आहे हे ओळखले, की तिला 'इस्टर एग'ची बास्केट बक्षीस दिली जाते. 
  • जपान देशात तर दोन व्हॅलेंटाईन डे साजरे केले जातात. फेब्रुवारीला मुली आवडत्या मुलाला डार्क चॉकलेट देतात, तर मार्चला कुकीज किंवा व्हाईट चॉकलेट देऊन मुले आवडत्या मुलीला प्रेमाची कबुली देतात. 
  • कॅरिबियनमध्ये प्रेमदिवस हा कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. आप्तस्वकीयांच्या किंवा मित्रमैत्रीणींच्या सोबत मौजमजा करत येथे सेलिब्रेशन केले जाते. 
  • स्पेनमध्ये फक्त लव्ह बर्डस एकमेकांना भेटवस्तू देऊन, सोबत वेळ व्यतीत करून प्रेमदिनाचा आनंद लुटतात. 
  • इटलीमध्ये 'तुरीन' नावाच्या शहरात प्रेमीयुगुल त्यांच्या रेशीमगाठी जुळल्याचे जाहीर करतात.

व्हॅलेंटाईन डे 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com