
Ind Vs Pak
Sakal
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी सामना होत आहे. गतवेळेस दुबईत झालेल्या भारत-पाक सामन्याच्या वेळी दोन्ही खेळाडूंमध्ये मैत्रीचे वातावरण होते. यावर्षी मात्र स्पर्धा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सर्व कर्णधारांच्या एकत्रित पत्रकार परिषदेतच ठिणगी पडलेली दिसली. आता हे द्वंद्व ऐरणीवर आले आहे.