History of Women's Education in India : भारतीय स्त्रीशिक्षणाचा उज्ज्वल इतिहास

Indian Women Scholars and Writers History : इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून १८५७ पर्यंतच्या भारतीय विदुषी आणि लेखिकांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या मिलिंद ओक लिखित ग्रंथातून महिलांच्या शिक्षणाचा इतिहास, त्यांचे बौद्धिक योगदान आणि इंग्रजी राजवटीतच महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली या समजुतीला पुराव्यांच्या आधारे आव्हान देण्यात आले आहे.
Indian Women Scholars and Writers History

Indian Women Scholars and Writers History

esakal

Updated on: 

भारतीय विदुषी अणि लेखिका इ.स. १ ते १८५७’ या मिलिंद ओक लिखित इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच झाले. याच वेळी ग्रंथाच्या ओक यांनीच केलेल्या मराठी व हिंदी अनुवादाचेही प्रकाशन झाले. ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’च्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात आला.

भारतात महिलांना शिक्षणाची दारे उघडी नव्हती आणि ती फार उशिरा उघडण्यात आली, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यातूनच भारतात महिलांच्या शिक्षणाची सुरुवातच इंग्रजी राज्यातच झाली, असाही प्रवाद आहे. मात्र, इसवीसनाच्या आरंभापासून ते आजपर्यंत भारतात महिलांच्या शिक्षणाची सोय किंवा व्यवस्था होती. असंख्य महिला विचारवंतांनी, विदुषींनी आणि अभ्यासकांनी अलौकिक कामगिरीही बजावली. विशेष म्हणजे, युरोपात महिलांच्या शिक्षणाची स्थिती तितकीशी चांगली नव्हती आणि प्राचीन काळात युरोप भारताच्या मागेही होता. महिलांच्या शिक्षणाच्या प्रदीर्घ प्रवासात भारतात अनेक लेखिका, तत्त्वज्ञ, विचारवंत, विदुषी, कवयित्री जन्माला आल्या आणि त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेत मोठी भर घातली. या साऱ्या इतिहासाचा वेध घेण्याचे आणि तो इतिहास सुसंगत, तसेच ओघवत्या भाषेत मांडण्याचे महत्त्वाचे काम मिलिंद ओक यांनी या ग्रंथाच्या निमित्ताने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com