
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारतीय खेळाडूंनी टेबल टेनिस या खेळामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पदकांची लयलटू केली; मात्र जागतिक, आशियाई यांसारख्या स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करता आलेले नाही. ऑलिंपिकमध्ये तर पदकाचा श्रीगणेशाही अद्याप करता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी भारताच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी दक्षिण आशियाई विभागीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत २०२६मध्ये लंडन येथे होत असलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश मिळवला. हे प्रगतीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.