पूरग्रस्त भागासाठी महत्वाचेः मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय माहिती

पूरग्रस्त भागासाठी महत्वाचेः मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची शास्त्रीय माहिती

कोल्हापूर, सांगली जिल्हा हा पशुधनाचा. पण अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. इतका मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहाणीची विल्हेवाट कशी लावायची हाच प्रश्न सध्या पुरग्रस्तभागात भेडसावत आहे. शास्त्रीय पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट कशी लावायची या संबंधीचा हा लेख.... 

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती झालेल्या भागात पशुधनामध्ये मोठया प्रमाणात मर्तुक होण्याची शक्यता असते. मृत पशुधनांची वेळेवर योग्य विल्हेवाट लावण्यात आली नाही तर मानवी व इतर पशधनाच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. तरी मृत पशधनाची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

  1. पशुधनाच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनुष्यवस्ती पासून दूर जागेची निवड करावी.
  2. ही जागा विहीर, नाला, ओढा, नदी, धरणाचे बॅकवॉटर किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या स्रोतापासून ५०० फुटाच्या परिघात नसावी.
  3. मोठया मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी किमान ८ फूट खोल, ८ फूट लांब व ६ फुट रूंद खड्डा तयार करण्यात यावा. लहान मृत पशधनाची विल्हेवाट लावण्यासाठी ६ फुट खोल ६ फुट लांब व ४ फुट रूंद खड्डा तयार करण्यात यावा. त्यामध्ये तळाशी चुन्याचा एक इंचाचा थर देण्यात यावा. त्यामध्ये प्रथम चून्याचा थर द्यावा व नंतर मृत जनावर ठेवावे व त्यावर परत चुन्याचा थर द्यावा. चुना उपलब्ध न झाल्यास ब्लिचिंग पावडरचा उपयोग करता येऊ शकेल.
  4. खड्डा बुजवताना मृत पशुधनाच्यावर किमान तीन फुट मातीचा थर असावा. मृत शरीराच्या कुजण्याची क्रिया लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी शक्य असल्यास मृत जनावरावरती सेंद्रीय पदार्थ टाकण्यात यावेत. उदा. EM Solution फवारणी, पालापाचोळा, इत्यादी.
  5. गावातील भटकी कुत्री व इतर वन्य प्राण्यांनी मृत पशुधनाचे उत्खनन टाळण्यासाठी या जागेभोवती तात्पुरत्या स्वरूपात काटेरी कुंपण तयार करण्यात यावे.
  6. पशुधनाची मर्तुक झालेल्या जागे भोवती निर्जंतुकी करणासाठी जंतुनाशकांची फवारणी, ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करावा.
  7. तसेच संसर्गजन्य रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुधनाच्या गोठयाभोवती, पक्षीगृहे इत्यादी परिसरात जंतुनाशक द्रावणाची फवारणी (२ ते ४ टक्के सोडीयम हायपोक्लोराईट, फिनाईल, इत्यादी ) करण्यात यावी.
  8. गावात मोठया प्रमाणात मर्तुक झाली असल्यास विल्हेवाट लावण्यासाठी शक्यतो एकाच जागेची निवड करण्यात यावी.
  9. मृत पशुधनाच्या विल्हेवाटीसाठी कार्यरत व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याच्या रक्षणासाठी पर्सनल प्रोटेक्शन किट (PPE) वापरणे आवश्यक आहे.
  10. मृत पशूधनाचे मालक जागेवर उपलब्ध नसतील त्यांचे कानात टॅग असल्यास त्याचा क्रमांक तसेच पशुधनाचे वर्णनाची नोंद ठेवावी आणि छायाचित्र (तोंड व दोन्ही बाजूंचे) काढून ठेवावे.

 ( लेखक पुणे येथे पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com