esakal | Womens day 2021 : महिला शास्त्रज्ञांचा कोरोनाशी लढा

बोलून बातमी शोधा

Varsha_Potdar}

कोरोनाच्या भयंकर उद्रेकातही आम्ही कोणत्याही क्षणी मागे फिरलो नाही. आम्ही महिला आहोत, त्यामुळे मागे पडलो असे कधीच गेल्या वर्षभरात घडले नाही.

saptarang
Womens day 2021 : महिला शास्त्रज्ञांचा कोरोनाशी लढा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Women's day 2021 : पुणे : महिलांमध्ये एकाच वेळेला अनेक कामे करण्याचे कौशल्य उपजतच असते. स्वयंपाक घरात काम करताना हे कौशल्य स्पष्टपणे दिसते. नेमक्या त्याच कौशल्याचा वापर व्यावसायिक जीवनात केला. त्यामुळे कोरोना साथीच्या महाभयंकर उद्रेकात एकाच वेळी असंख्य आघाड्यांवर सुरू असलेल्या लढाई लढता आली. ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’मधील (एनआयव्ही) शास्त्रज्ञ वर्षा पोतदार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’शी बोलत होत्या.

खरं म्हणाल विज्ञानात स्त्री-पुरुष असा फरक नसतो. पण, संशोधन क्षेत्रात आता नव्याने मुली येण्याचा कल प्रकर्षाने दिसतो. ‘एनआयव्ही’मध्ये तर माझी संपूर्ण टिममध्ये महिलाच आघाडीवर आहेत, असा अभिमान पोतदार यांच्या बोलण्यातून दिसतो.

Women's day 2021 : सोशल मीडियावर कसा आहे महिला आमदारांचा वावर? जाणून घ्या​

देशात गेल्या वर्षी जानेवारीपासून कोरोनाचे एक-एक रुग्ण सापडू लागले. फेब्रुवारीपासून कोरोना तपासणीच्या नमुन्यांची संख्या वाढू लागली. एकाच वेळी रोजच्या रोज येणाऱ्या हजारो नमुन्यांचे टेस्टिंग, देशभरातील प्रयोगाशाळांची गुणवत्ता नियंत्रण, पुण्यातून देशभरात केला जाणारा वेगवेगळ्या साहित्यांचा पुरवठा अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढाई सुरू झाली. पण, या सगळ्या मोहिमांवर लढणाऱ्यांमध्ये ‘टिम एनआयव्ही’तील महिला आघाडीवर होत्या. त्यांनीच ही विजयी पताका लावली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

होय, मी मित्रांसाठी काम करतो; पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींची 'मन की बात'!​

‘एनआयव्ही’च्या संचालिका प्रिया अब्राह्म आहेत. विलगिकरण, लसबाबतची पूर्वतयारी, त्यासाठी प्राण्यांवरील चाचण्या याची जबाबदारी सांभाळण्याऱ्या डॉ. प्रज्ञा यादव आहेत. विषाणूंच्या जनुकीय अभ्यासात जैवमाहिती डॉ. सेरा चेरियन देतात. त्याच बरोबर ‘मेक इन इंडिया’तील किटच गुणवत्ता चाचणीसाठी डॉ. कविता लोळे, ‘एनआयव्ही’ची वेबसाइटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करणारी डॉ. राजलक्ष्मी, डॉ. मल्लिका या सगळ्या महिला शास्त्रज्ञ आहेत. इतकंच नाही तर, लेखापाल विभावरी शेंडे, प्रशासकीय अधिकारी अमृता बकरे, खरेदी अधिकारी सुनीता खामकर, डिसबसिंग ऑफिसर शिबी जेकब या सगळ्या पदांची जबाबदारी महिलांनी सांभाळली असल्याचे त्यांनी सांगितले.

सौंदर्यखणी : चांदणे शिंपीत जाणारी... ‘चंद्रकळा’

त्या म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या भयंकर उद्रेकातही आम्ही कोणत्याही क्षणी मागे फिरलो नाही. आम्ही महिला आहोत, त्यामुळे मागे पडलो असे कधीच गेल्या वर्षभरात घडले नाही. उलट, आम्ही सगळ्यांनी अधिक झोकून देऊन काम केले. उद्रेकाच्या सुरवातीच्या काळात किमान १७ ते १८ तास काम करवे लागत होते. जेमतेम दोन-चार तासांपुरते आम्ही घरी जात होतो. पण, या काळात घरातून भक्कम पाठिंबा मिळाला.’’

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)