esakal | होय, मी मित्रांसाठी काम करतो; पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींची 'मन की बात'!
sakal

बोलून बातमी शोधा

PM_Modi

पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

होय, मी मित्रांसाठी काम करतो; पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींची 'मन की बात'!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : ''माझे विरोधक म्हणतात की मी मित्रांसाठी काम करतो. होय, मी माझ्या मित्रांसाठी काम करतो. ते माझे मित्र गरीब, मजूर आणि शोषित वर्गातील लोक आहेत. भाजप फक्त घोषणांवर नाही, तर घोषांच्या अंमलबजावणी करण्यात विश्वास ठेवते. आणि तेदेखील दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते,'' असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. 

कोलकाता येथील ब्रिगेड मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मोदी पुढे म्हणाले की, ''मोदी त्यांच्या मित्रांसाठी काम करतात, असा आरोप माझ्यावर केला जातो. आपलं बालपण ज्या लोकांमध्ये गेलेलं असतं, ज्या परिस्थितीत वाढलेलो असतो, तीच माणसं आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. मीदेखील गरिबीत वाढलो, त्यामुळं त्यांचं दु:ख काय आहे, याची मला कल्पना आहे. मी मित्रांसाठी काम करतो आणि फक्त मित्रांसाठीच काम करीन.''

सौंदर्यखणी : चांदणे शिंपीत जाणारी... ‘चंद्रकळा’

चहाच्या मळ्यात काम करणारे माझे खास मित्र
मी माझ्या बंगालमधील मित्रांसाठीही काम करत आहे. मी आतापर्यंत ९० लाख गॅस कनेक्शन दिले. अंधारात राहत असलेल्या बंगालमधील ७ लाखाहून अधिकजणांना विनामूल्य वीज कनेक्शन दिले. तसेच ६० लाखाहून अधिक शौचालये बांधली. गरीब-मागास आणि शोषित वर्गाला या योजनांचा लाभ झाला आहे. इथल्या चहाच्या मळ्यात काम करणारे लोक माझे खास मित्र आहेत. मी करत असलेल्या कामांमुळे त्यांच्या बऱ्याच समस्या सुटल्या आहेत, याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, चहाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. कोरोनाने संपूर्ण जग त्रासले होते, याचा सर्वात जास्त फटका गरीबांना बसला. या काळात विनामूल्य रेशन, गॅस कनेक्शन आणि थेट बँक खात्यात पैसे पाठवले. तुम्ही सर्वजण माझे मित्र आहात. 

Women's Day 2021 : ''फेमिनिझम शिवी नाही, वास्तव आहे!'' | eSakal

दीदींनी जनतेचा विश्वासघात केला
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, बंगालमधील बदलासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता, पण दीदीने तुमची स्वप्न धुळीस मिळवली. या लोकांनी बंगालचा अपमान केला. पण भारतमातेच्या आशीर्वादाने सोनार बांगला एक दिवस नक्की सिद्ध होईल. शेतकरी, तरुण, व्यापारी, बहिणी-मुलींसाठी दिवसरात्र काम करू, हा विश्वास देण्यासाठी मी इथं आलोय. प्रत्येकवेळी कामांच्या मार्फत लोकांची मने जिंकत राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

नशीब दुसरं काय! पश्चिम बंगालच्या मजुराला केरळमध्ये लागली 80 लाखांची लॉटरी

 - देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image