मानससूत्र : व्यावसायिक संवादकौशल्य

परिणामकारक संवादकौशल्य सवयीने दिवसेंदिवस विकसित होऊ लागते. ज्याचे वैयक्तिक; तसेच व्यक्तिपत्वे फायदे गेल्या तीन-चार लेखांत आपण पाहिले.
Professional communication skills
Professional communication skillssakal
Summary

परिणामकारक संवादकौशल्य सवयीने दिवसेंदिवस विकसित होऊ लागते. ज्याचे वैयक्तिक; तसेच व्यक्तिपत्वे फायदे गेल्या तीन-चार लेखांत आपण पाहिले.

- डाॅ. जयश्री फडणवीस

परिणामकारक संवादकौशल्य सवयीने दिवसेंदिवस विकसित होऊ लागते. ज्याचे वैयक्तिक; तसेच व्यक्तिपत्वे फायदे गेल्या तीन-चार लेखांत आपण पाहिले. आता याच संवादकौशल्याचा फायदा एखाद्या व्यवसायाला अथवा संस्थेच्या विकासाला कसा होत जातो ते पाहू या.

Corporate communication is done to achieve planned objectives and goals of an organisation.

१. संस्थेतील अंतर्गत संवाद (Internal communication)

यामध्ये रोजच्या विभागीय मीटिंग, नोटिसा, ई-मेल; तसेच विविध चर्चांचा समावेश होतो. तसेच व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यातील संवाद. हे सर्व संवाद सुस्पष्ट, जाणीवपूर्वक; तसेच जबाबदारीने करणे आवश्यक असते. यामुळे संस्थेच्या विकासासाठी पोषक; तसेच आश्वासक वातावरण तयार होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःची संस्थेतील भूमिका नीट समजण्यास मदत होते.

२. बहिर्गत संवाद (Extenal communication)

हा संवाद गुंतवणूकदार, ग्राहक, उत्पादक; तसेच जाहिरातदार यांच्यामध्ये घडत असतो. या सर्वांना आपल्या संस्थेचे Visiom, mission आणि values सांगून संस्थेची विश्वासार्हता सांभाळत, संस्थेला नावारूपाला आणणे यासाठी केला जातो.

३. आव्हाने आणि अडथळे (Crisis management)

आजच्या अतिशय वेगवान व्यावसायिक जगतात सतत काही ना काही आव्हानांना तोंड द्यावे लागते. जसे की, उत्पादन क्षेत्र, आर्थिक आवक-जावक; तसेच प्रत्येक क्षेत्रातील जनसंपर्क करताना होणारे समज-गैरसमज हे सर्व उत्तम संवादकौशल्यानेच हाताळता येते.

४. नेतृत्व आणि व्यवस्थापन (Leadership and management)

जेव्हा एखादे काम करण्याची वेळ येते, तेव्हा संवाद हे कोणत्याही नेत्याकडे असलेले सर्वांत महत्त्वाचे कौशल्य आहे. परिणामकारक संवाद केल्याने तुमच्यातील नेतृत्वगुण वाढीस लागतो. छोट्या-मोठ्या समूहांना सांभाळा. त्यांना संस्थेच्या कामाची माहिती, त्यांच्या पातळीवर जाऊन, त्यांना समजेल अशा भाषेत सांगणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. यातूनच तुमच्यात एक उत्तम श्रोता तयार होतो.

समोरच्याची बाजू नीट समजून घेऊन, त्याला जमेल, झेपेल असे काम सोपवणे आणि ते उत्तम प्रकारे, सतत मागोवा घेऊन पूर्ण करून घेणे ही जबाबदारीही नेतृत्वाचीच असते. आपण ऐकतो, तेव्हा आपण अधिक सामर्थ्यवान होत जातो. प्रतिनिधीत्व अधिकाधिक प्रभावी होत जाते.

५. मिश्र संस्कृतीशी संवाद (Cross Culture Communication)

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वैविध्यपूर्ण संस्कृतीशी संवाद करण्याची क्षमता आपल्याला वाढवायला हवी. कारण आपले गुंतवणूकदार; तसेच ग्राहक हे जगभर आहेत, अशा या जागतिक संवादकौशल्यात अनेक वेगवेगळी आव्हाने आपल्यासमोर येतील. अनेक प्रगत देशांशी संवाद साधावा लागणार आहे. उदाहरणार्थ, जपान. सुरुवात जपानी भाषा शिकण्यापासून होईल; तसेच तेथील वागण्याच्या पद्धती, चालीरीती समजून घ्याव्या लागतील. भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून परिणामकारक संवाद प्रस्थापित करता येईल.

६. वाटाघाटी कौशल्य (Negotiation Skills)

कोणत्याही करारावर पोचण्याच्या उद्देशाने जी चर्चा केली जाते, त्याला Negotiations अथवा वाटाघाटीचे कौशल्य म्हणता येईल. व्यावसायिक विकास; तसेच प्रगतीकरता प्रत्येक पावलापावलावर वाटाघाटी कराव्या लागतात. मग ते एखाद्या गोष्टीचे विपणन (marketing) असो की आंतरदेशीय कंपनी सहयोग (Collaboration), उत्तम संवादकौशल्यावारे कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटीत विधायक आणि अपेक्षित विजय मिळवता येतो. आजचे जग हे माहिती-तंत्रज्ञानाचे आहे, त्यातून आता मानवाच्या बुद्धिमत्तेला आव्हान द्यायला आली आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence). पण या सर्वांचा वापर तेव्हाच करता येईल, जेव्हा आपण भाषा आणि संवादकौशल्यात निपुण असू. प्रभावी संवाद हा सर्व क्षेत्रांतील यशाचा मार्ग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com